Type Here to Get Search Results !

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे चरित्र व शिक्षक दिन विषयी माहिती मराठी माहिती | Dr.Sarvepalli Radhakrishnan and Teacher day information in Marathi.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे चरित्र व शिक्षक दिन विषयी माहिती मराठी माहिती| Dr.Sarvepalli Radhakrishnan and Teacher day information in Marathi.

नमस्कार बंधू-भगिनींनो !आज आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षक दिन याबाबत माहिती लिहिण्यासाठी लेख हाती घेतला आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक भारतीय तत्त्वज्ञानी शिक्षक आणि राजकारणी होते."शिक्षक दिन" हा शिक्षकांच्या कामांचा विशेष कौतुक करणारा दिवस आहे. शिक्षका विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे. समाजातील शिक्षकांच्या योगदान व कार्यांची आठवण व्यक्त करणारा शिक्षकाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस "शिक्षक दिन" म्हणून साजरा करण्यात येतो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे चरित्र व शिक्षक दिन विषयी माहिती मराठी माहिती
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे चरित्र व शिक्षक दिन विषयी माहिती मराठी माहिती 

 5 सप्टेंबर 1962 पासून आपल्या संपूर्ण देशात म्हणजे भारत देशात शिक्षक दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर 1962 साजरा करण्यात सुरुवात झाली आहे. शिक्षकाची समाजातील प्रतिष्ठा व सन्मान व्यक्त करणारा हा दिवस आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान ठरले आहेत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवन शिक्षण क्षेत्रातून सुरुवात होऊन शिक्षक व्यवसायापासून तर भारताच्या राष्ट्रपती पर्यंत जाऊन त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरल्यामुळे. त्यांचा जन्म दिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे त्यांचेच स्वतः मत होते. डॉक्टर राधाकृष्णन यांचे शैक्षणिक विचार व कार्य पाहता प्रचंड योगदान देशाला त्यांनी त्यांच्या कार्यातून दिले आहेत. म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षक दिनाची कल्पना ही 19 व्या शतकात रुजल्या गेली. गेल्या वर्षी 2022 मध्ये "शिक्षक दिन" हा संपूर्ण देशभर "आभार दिन "म्हणून साजरा करण्यात आला आहे. तसेच जागतिक शिक्षक दिन म्हणून हा दिवस दरवर्षी 5 ऑक्टोंबर ला जगात साजरा करण्यात येतो कारण भावी पिढीला सक्षम बनवण्याचे कार्य फक्त शिक्षक बनू शकतो .हे सर्वांना मान्य करावे लागेल. भारतात मात्र आपण पाच सप्टेंबर हा दिवस महत्त्वाचा मानतो. शिक्षकांच्या कामाचा गौरव या दिवशी केला जातो. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना या दिवशी आदर्श शिक्षक म्हणून गौरव केला जातो. आणि आदर्श शिक्षक पुरस्कारही प्रधान करण्यात येतो. जगभरात शिक्षक दिन हा वेगवेगळ्या दिनांक साजरा करण्यात येत असतो.



सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे चरित्र(toc)


1)डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा परिचय:-

डॉक्टर राधाकृष्णन हे भारतीय तत्त्वज्ञ आणि राजकारणी होते. त्यांचा जीवन कालखंड पाच सप्टेंबर 1988 ते 17.एप्रिल 1975 हा महत्त्वाचा जीवनकार्याचा कालखंड आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन पहिले भारताचे उपराष्ट्रपती होते. उपराष्ट्रपती पदांचा त्यांचा कालखंड 1952 ते 1962 हा होय. भारताचे दुसरे राष्ट्रपतीराष्ट्रपती 1962 ते 1967 दुसरे राष्ट्रपती कालखंड हा गणला गेला आहे. अतिशय बुद्धिमंत म्हणून तत्त्ववेता म्हणून जगभरात अनेक पारितोषिकाने त्यांना सन्मानित केले गेले. राधाकृष्णन यांनी वेदावर आधारित तत्त्वज्ञान मांडले आहेत. तू येत युनियन मध्ये भारताचे दुसरे राजदूत म्हणून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहेत आणि उल्लेखनीय आहेत. बनारस विद्यापीठात ते कुलगुरू सुद्धा होते. डॉक्टर राधाकृष्णन यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार महत्त्वाचा मानले गेलेला भारतरत्न असा पुरस्कारही सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आला आहे व गौरव करण्यात आला आहे.


भारतीय इतिहासातील महान तत्वज्ञ व शिक्षक असणारे राष्ट्रपती पदापर्यंत यशस्वी पुणे काम करणारे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे होत. सर्व क्षेत्रांमध्ये ते विद्वान होते. म्हणून त्यांना सर्वपल्ली असे म्हणतात.


2)डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन कुटुंबाचा प्रवास:-

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये तामिळनाडूतील मद्रास प्रेसिडेन्सी मधील चित्तूर जिल्ह्यातील तिरूतानी या लहान छोट्या गावात तेलुगु कुटुंबात झाला. सध्याचे राज्य म्हणजे ते राज्य आंध्र प्रदेश आहेत. त्यांच्या वडीलाचे नाव विरा स्वामी हे होते. आईचे नाव सिताम्मा हे होते. राधाकृष्णन यांचे गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील महसूल विभागात काम करीत होते. अगदी गरीब असे होते.. त्यांच्या कुटुंबातील दोन अपत्यापैकी राधाकृष्णन हे दुसरे आपत्य होते.. त्यांचे संपूर्ण जीवन आई-वडिलांचे दक्षिण भारतात असल्यामुळे तेथेच खर्ची झाले. तेलगू समाजातील ब्राह्मण कुटुंबाचा एक सहभाग महत्त्वाचा सहभाग होता.


3)डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक कालखंड:-

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे  शिक्षण ख्रिश्चन मिशन स्कूल मध्ये झाले. मद्रास मिशन स्कूल मे लवकरच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना ओळखले की अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा विद्यार्थी असामान्य व शैक्षणिक क्षमता प्राप्त करणारा म्हणून पुढे येणार आहे त्या दृष्टिकोनातून त्यांना शैक्षणिक मदत शिक्षकाकडून प्राप्त झाली व त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले.मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून शिक्षणाची सुरुवात करून कॉलेज जीवनामध्ये प्रथम पदवी व तत्त्वज्ञान विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रथम सहाय्यक प्राध्यापक नंतर प्राध्यापक म्हणून मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण देण्याचे काम केले. त्यानंतर त्यांनी पुढे मैसूर विद्यापीठांमध्ये 1918 ते 1921 च्या दरम्यान तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम करत असताना विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव केला.


पुढे त्यांची कलकत्ता विद्यापीठाने तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली. तेथे त्यांनी विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञानाचे ज्ञान दिले. कलकत्ता विद्यापीठामध्ये त्यांनी 1921 ते 1931 पर्यंत म्हणजे दहा वर्ष तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले हे काम त्यांचे उल्लेखनीय असे होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे मोलाचे कार्य पाहून नेत्रदीप प्रगती करणारे डॉक्टर राधाकृष्णन यांची पुढे नियुक्ती 1931 ते 1936 मध्ये आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू कार्य केले. अतिशय बुद्धिवंत कुलगुरू म्हणून त्यांचा तिथेही गौरव झाला. ते त्यांचे काम पाहून पंडित मदन मोहन मालवीय यांनी त्यांना एक विनंती केली की आपण बनारस विद्यापीठांमध्ये काम करावे. त्यांच्या विनंतीवरून त्यांनी 1939 ते 1948 पर्यंत बनारस विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कामकाज पाहिले कलकत्ता विद्यापीठ आणि बनारस विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठात काम पाहत असताना डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्या करून कलकत्ता विद्यापीठातील आठवडाभराचे अध्यापन दिवस सांभाळून रविवार शनिवार हे दोन दिवस बनारस विद्यापीठाचे प्रशासकीय कारभार पाहत असत. याचा अर्थ त्यांना अध्यापन करण्यात गोडी होती. डॉक्टर राधाकृष्णन यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अध्यापनाचे कार्य केले जवळजवळ वीस वर्षे त्यांनी तेथे दर वर्षातून काही महिने जाऊन वीस वर्षे केलेले कार्य अध्यापनाचे उल्लेखनीय असे कार्य होते ‌. डॉक्टर राधाकृष्णन यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये 1936 ते 1952 पर्यंत विद्यासन निर्माण केले. नंतर पुढे त्यांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी त्यांनी दिली. आणि आपल्या कामाची सुरुवात राजकीय क्षेत्रात करावी अशी इच्छा झाल्यामुळे ते राजकीय क्षेत्रात जाण्याचा विचार करू लागले. व राजकारणात त्यांनी प्रवेश केला.


4)डॉक्टर राधाकृष्णन यांची राजकीय वाटचाल:-

आपल्या शैक्षणिक कार कीर्ती त्यांनी सर्वात जास्त कालखंड हा शिक्षेची पेशामध्येच मोलाचे कार्य करण्यात घातल्यामुळे त्यांचे शिक्षणाबद्दल चे व तत्त्वज्ञानाबद्दलचे विचार बुद्धिवंत शिक्षक म्हणून पुढे आले म्हणून त्यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करावा ही महत्त्वाची कल्पना पुढे आली.


राजकारणात प्रवेश केल्यानंतर डॉक्टर राधाकृष्णन यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे सर्वप्रथम भारताचे उपराष्ट्रपती म्हणून 13 मे 12 मे 1962 पर्यंत यशस्वी कामकाज त्यांनी पूर्ण केले त्यामुळे त्यांना 1954 मध्ये भारतरत्न म्हणून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद नंतर त्यांना भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून नियुक्त करून स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांनी 13 मे 1962 ते 13 मे 1967 या कालखंडामध्ये भारताला विकसनशील मार्गावर नेण्यासाठी व भारताचा विकास होण्यासाठी त्यांनी मोठे कामकाज केले. त्यांचा राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा होता धर्माने हिंदू असून व्यवसाय राजकारण तत्त्वज्ञान आणि प्राध्यापक म्हणून त्यांनी संपूर्ण राजवट यशस्वी करून दाखवली.


5)शिक्षक दिनाविषयी विशेष माहिती:-

भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण शिक्षक ते राष्ट्रपती पर्यंतच्या कालखंडात अतिशय सन्माननीय कार्य केल्याबद्दल त्यांचा जन्मदिवस हा दरवर्षी आपल्या भारत देशामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो कारण त्यांची शिक्षण क्षेत्रातील तळमळ व जिव्हाळा व त्यातून आयुष्यभर अधिकाधिक विकास करत शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिल्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा वारसा शिक्षकांनी पुढे चालवावा व शिक्षक सन्मान सत्याचा तसेच ज्ञानाचा आणि संस्कृतीचा ज्ञान वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे शिक्षक संक्रमित करत असल्यामुळे अशा शिक्षकांचा गौरव व्हावा सन्मान व्हावा आणि तो प्रयत्नशील असावा कोणत्याही प्रकारे सत्तेची लालसा न धरता सत्याच्या व ज्ञानाचे प्रयोग करणारा हा शिक्षक असतो असे त्यांचे मत होते. कोणत्याही प्रकारची क्रांती जर आपणास घडून आणायची असल्यास तर शिक्षकांनी दिलेल्या शिक्षणातून क्रांती घडू शकतो व समाजाला सुसंस्कृत व सर्वांगीण प्रगती करू शकणारा व आदर्श नागरिक घडवणारा कोण असेल असा प्रश्न निर्माण होतो? एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला परिपूर्ण ज्ञान देत असताना तो स्वतः परिपूर्ण असला पाहिजे आणि अनेक विषयाचा त्यांनी अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी समाज .राज्य आणि देश पुढे येतात. डॉक्टर राधाकृष्णन यांनी अनेक विचारवंतांचे संस्कृत भाषेपासून तर इंग्रजी भाषेपर्यंत अनेक लेख कविता वाचून त्यांनी त्या मार्फत परिपूर्ण पद्धतीने अध्यापन प्राध्यापक या नात्याने आयुष्यभर केले त्यामुळे संपूर्ण जगाने डॉक्टर राधाकृष्णन यांचा गौरव केलेला आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे अतिशय आदर्श शिक्षक आणि आपल्या देशाबद्दल त्यांना वाटणारे त्यांचे प्रेम त्यांनी त्यांच्या जीवनात अखंड 40 वर्ष काम करून शिक्षण क्षेत्रामध्ये एक आदर्श व्यक्ती म्हणून पुढे आले म्हणून शिक्षकापासून तर राष्ट्रपती पर्यंत असणारा हा कालखंड भारत देशाला म्हणजे आपल्या देशाला एका आदर्श शिक्षकाने आदर्श संस्कृती निर्माण करण्याचे काम डॉक्टर राधाकृष्णन यांनी केल्यामुळे ते उत्तम शिक्षक झाले. चाळीस वर्ष ज्ञानांजन करून आदर्श शिक्षक झाल्यामुळे त्यांचा जन्म दिवस हा शिक्षकांचे कौतुक करणारा दिवस म्हणून शिक्षण दिन साजरा करावा म्हणून त्यांनी जाहीर केले. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या मते माझा जन्मदिव स शिक्षक दिन म्हणून दरवर्षी पाच सप्टेंबरला साजरा करण्यात यावा आणि दरवर्षी येत आहे. शासन या दिवशी आदर्श शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारही सुद्धा राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मानित करून पुरस्कार बहाल करण्यात येतो.


6)डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी खाली नमूद केलेल्या विषयात नैपुण्य संपादन केले व पारितोषिकही मिळवले.

  1. संस्कृती अभ्यास
  2. धर्म व वेद अभ्यास
  3. नीतीशास्त्र अभ्यास
  4. धर्मशास्त्र अभ्यास
  5. तापी का योगदान अभ्यास
  6. पूर्वेकडील देशाचे तत्त्वज्ञान अभ्यास
  7. पश्चिमा ते देशाचे तत्त्वज्ञान अभ्यास
  8. आधुनिक वैज्ञानिक विचार अभ्यास
  9. भारतीय अध्यात्म तत्त्वज्ञान अभ्यास
  10. भारतीय एकात्मता अभ्यास
  11. हिंदू धर्मग्रंथ अभ्यास
  12. सात्विक विचाराची रूपरेषा अभ्यास
  13. राजकीय अभ्यास
  14. भारतीय तत्त्वज्ञान अभ्यास
  15. भारतीय तत्त्वज्ञानाचा शिक्षणावर प्रभाव
  16. अध्यात्म व विज्ञान यांचा समतोल अभ्यास
  17. अष्टपैलू व्यक्तिमत्व चा अभ्यास
  18. नीती वाद व संस्कृतीचा सखोल अभ्यास
  19. मानवी वर्तनवादाचा अभ्यास
  20. भारतातील प्रसिद्ध तत्त्ववेतांचा अभ्यास
  21. नव्या पिढीला विचार क्षमता देण्याचा अभ्यास
  22. एक तत्त्वज्ञ आणि शिक्षण तज्ञ अभ्यास
  23. प्रतिभावंत राजकारणी अभ्यास
  24. द प्रिन्सिपल उपनिषदे लेक लिखाण
  25. प्रभावी शिक्षक व मार्गदर्शक
  26. प्रभावशाली विचारवंत
  27. आयुष्यभर शिक्षण शिकण्याचा प्रयत्न
  28. यशस्वी राजकारणी
  29. संशोधनात्मक विचारशैली
  30. आंतरराष्ट्रीय संबंध
  31. अनेक विषयावर विपुल लेखक म्हणून लिखाण
  32. जीवनाचा आदर्शवादी दृष्टिकोन अभ्यास
  33. समकालीन तत्त्वज्ञानातील धर्माचे राज्य अभ्यास
  34. शास्त्रज्ञ व संशोधक अभ्यास
  35. जीवशास्त्रज्ञ अभ्यास
  36. रसायन शास्त्रज्ञ म्हणून नोबल पारितोषिक प्राप्त
  37. वैदिक शास्त्रामधील नोबल पारितोषिक
  38. अनुवंशिक कोड व प्रथिने संश्लेषण अभ्यास
  39. भौतिक शास्त्रातील उत्क्रांती सिद्धांत अभ्यास

7)सारांश;-

म्हणून अशा प्रतिभाशाली व प्रतिभावंत शिक्षकापासून राष्ट्रपती पर्यंत कार्य करणाऱ्या माणसाचा जन्मदिवस म्हणजे डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे भारतीय संस्कृतीचे दूध आणि प्रसिद्ध शिक्षण तज्ञ तसेच महान राजकारणी व क्षेत्रात जे महत्त्वाचे योगदान दिले अशा व्यक्तीच्या सन्मानार्थ त्यांचा जन्म दिवस आज आपण साजरा करत आहोत आजचा शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी शिक्षक दिन हा विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण असून शिक्षकांनी केलेल्या सन्माननीय कार्याबद्दल डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार अभ्यासणे काळाची गरज ठरत आहे. आपले पहिले गुरू कोण असेल? तर ते म्हणजे आई आणि वडील. त्यानंतर आपले मित्र म्हणून फक्त शिक्षकच नाही तर एक मार्गदर्शक व नवीन दिशा दाखवणारे आयशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्याला यशस्वी जीवनाचा अग्रेसर बनवणारा कोण? मार्गदर्शक असतो. अतिशय जिद्दीने आणि कष्टात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यासात कणखर बनवणारा तो कोण ?असतो. तो म्हणजे शिक्षक होय. संपूर्ण भारतीय पिढीने आमच्या शिक्षकावर शिक्षक दिनाच्या निमित्ताने विश्वास व्यक्त करून आमचा गौरव केला त्या सर्वांना आम्ही शिक्षक वचन देऊन सांगतो की, आमच्यावर दाखवलेला विश्वास हा आम्ही नक्की विद्यार्थ्याला निरास न करता यशाच्या अग्रेसर करण्यासाठी आमच्या जवळ असलेली जी शिदोरी आम्ही प्राप्त केली ती शिदोरी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांचे चांगले व्यक्तिमत्व व उज्वल भविष्य घडवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहेत. मित्रांनो आम्ही शिक्षक म्हणून आजच्या शिक्षक दिनी आमचा आपण जो सत्कार करत आहात जो गौरव करत आहात तो गौरव म्हणजे सामान्य गौरव नये तर असामान्य गौरव आहेत म्हणून जाता जाता पुन्हा एकदा आपणाला शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन शिक्षक दिनी वचन देतो की, आम्ही आमची जबाबदारी आणि कर्तव्य दक्ष रीतीने पार पाडू व नवीन शैक्षणिक धोरणाच्या आधारे 2030 मध्ये आपला विद्यार्थी जगातील एक महाशक्ती बनवणारा नागरिक घडवणार आहे. धन्यवाद मित्रांनो. वंदे मातरम.


FAQ

1) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण न यांचा जन्म केव्हा झाला होता?

5 सप्टेंबर 1888.


2) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो?

शिक्षक दिन


3) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून त्यांचा कालखंड सांगा?

1952 ते 1962.


4) डॉक्टर राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांचा कालखंड कोणता होता?

1962 ते 1967


5) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या नागरिक सेवेबद्दल कोणत्या सन्मानाने सन्मानित केले?

भारतरत्न


अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा.


1) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मराठी माहिती.


2) लोकमान्य टिळक मराठी माहिती.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation