Type Here to Get Search Results !

शाळा मुख्याध्यापकाचे वार्षिक कामकाज नियोजन |Yearly Planning of School Head Master

 शाळा मुख्याध्यापकाचे वार्षिक कामकाज नियोजन |Yearly Planning of School Head Master

शाळेचा प्रमुख अध्यापक म्हणजे मुख्याध्यापक. शाळेचे शैक्षणिक व्यवस्थापन, प्रशासकीय कामकाज, सामाजिक भूमिका, आणि संस्था स्तरावर प्रमुख काम करणारा मुख्याध्यापक असतो. त्याला शासनाकडून नियमानुसार मुख्याध्यापक म्हणून वैयक्तिक मान्यता प्रदान केलेली असते. सर्व दृष्टिकोनातून मुख्याध्यापक हा एक प्रकारचा दुवा आहे. त्याला आपले व्यवस्थापन करावे लागते ‌. नियोजनाशिवाय कोणताही मुख्याध्यापक यशस्वी कामकाज करू शकत नाही. मुख्याध्यापकाला शाळेतील कामकाज पाहताना वार्षिक बारा महिन्याचे करावे लागते. मुख्याध्यापक हा शाळेतील महत्त्वाचा पाठीचा कणा असतो. त्याच्या कार्यशैलीवर शालेय स्तरावर आदेशात्मक कामकाज करून घेण्यासाठी त्याला त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. 


शाळा मुख्याध्यापकाचे वार्षिक कामकाज नियोजन
शाळा मुख्याध्यापकाचे वार्षिक कामकाज नियोजन



मुख्याध्यापकाचे वार्षिक कामकाज नियोजन(toc)

महाराष्ट्रात तर काही शाळा फक्त मुख्याध्यापकाच्या नावानेच ओळखल्या जातात कारण त्या शाळेचा मुख्याध्यापक हा प्रभावी घटक म्हणून कामकाज यशस्वी करत असतो. मुख्याध्यापकाला आपली यशस्वी भूमिका पार पाडण्यासाठी स्वतःच्या कामकाजाचे वार्षिक नियोजन शाळा सुरू होण्याच्या अगोदरच करावे लागते. मग मुख्याध्यापकाचे शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन आपण या लेखातून स्पष्ट करणार आहोत. शाळा सुरू झाल्यापासून शाळा बंद होईपर्यंत त्याला हे कामकाज व कामकाजाची नियोजन आवश्यक आहे. प्रत्येक महिन्याला मुख्याध्यापकाला स्वतःची नियोजन वर्षाच्या सुरुवातीलाच निश्चित उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य प्रकारे करावे लागते. म्हणून मुख्याध्यापकाच्या वार्षिक कामकाजाचे नियोजन शालेय स्तरावर खाली दर्शविल्याप्रमाणे स्पष्ट करत आहोत.

1) मुख्याध्यापकाचे जून महिन्याचे वार्षिक नियोजन:-

संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ सर्वच शाळा जून महिन्यामध्ये सुरू होते. शाळा सुरू होताच मुख्याध्यापकाचे नियोजन तयार केलेले असल्यामुळे त्याला याबाबत काही अडचणी येत नाहीत. जून महिन्यात मुख्याध्यापक यांना खालील कामकाज नियोजन करावे लागते. शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना शासकीय नियमाप्रमाणे करून त्या समितीचे सचिव या नात्याने मीटिंगचे आयोजन करणे आवश्यक आहे. कमीत कमी सहा मीटिंगची आयोजन करून त्यासंबंधी ठराव व सूचना वही अद्यावत ठेवी ठेवावी लागते. ज्या ज्या प्रकारच्या समित्या शाळेमध्ये आहेत त्या सर्व समित्यांचे कामकाजाचे विभाजन करून प्रोसिडिंग तयार ठेवावे लागते. त्यानंतर शाळा ज्या दिवशी प्रथम दिवशी सुरू होईल त्याच दिवशी पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप करून नियोजन ठेवावे तसेच शिक्षक पालक सभा आयोजन करून संबंधित बाबतीत प्रोसिडिंग अद्यावत ठेवावेत. शाळेतील विद्यार्थी स्टुडन्ट प्रमोशन करणे व शासनाकडून मिळालेल्या अनुदाना तून शालेय साहित्य खरेदी करणे. शासनाच्या नियमानुसार साहित्य खरेदी नियमानुसार करावी. आपल्या शाळेतील प्रत्येक शिक्षकांचे पाठ तपासण्यासाठी शाळा लॉग बुक भरण्याचे कामाचे नियोजन करणे. पटनांनी पंधरवडा अभियान राबवणे. 


पायाभूत परीक्षा पूर्वतयारी करून वर्ग सजावट व वर्ग स्वच्छता उपक्रम यांचे नियोजन बरोबर आपल्या शाळेतील वर्ग व शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करणे. शाळा स्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभराची आखणी करणे. Staff attached detach करणे. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन उपक्रम राबवणे. इयत्ता पहिली व नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ कार्यक्रम नियोजन आवश्यक आहे. तसेच स्टुडन्ट रिक्वेस्ट पाठवणे आणि कन्फर्म करणे. जून महिन्याचे शालेय पोषण आहाराचे नियोजन पूरक आहार व धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे. जून महिना असल्यामुळे वृक्षारोपण व संवर्धन याबाबतही नियोजन आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा निकाल व गुणपत्र व दाखले देणे घेणे बाबत नियोजन.


2) मुख्याध्यापकाचे जुलै महिन्याचे कामकाज नियोजन:-

जुलै महिन्यामध्ये माता पालक- संघ स्थापन करून रेकॉर्ड ठेवणे. सरल प्रणालीवर स्टुडन्ट रिक्वेस्ट कन्फर्म पाठवणे.


ज्या ज्या समित्या स्थापन करण्यात येईल त्या त्या समित्यांचे रेकॉर्ड अद्यावत करण्याचे काम महत्त्वाचे आहेत. मीना राजू मंच सभा घेणे. शाळा व्यवस्थापन समितीची मीटिंग घेणे. विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धा आयोजन करणे. शालेय पोषण आहार सभा घेणे. दिंडी उपक्रम आयोजन करणे शासकीय नियमांना धरून सर्व कामकाज व्यवस्थित करणे. शिक्षक पालक संघ स्थापन करून 30 जुलै च्या आत शिक्षक पालक संघाची यादी शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्याकडे जमा करणे. शालेय कामकाजासाठी शिक्षक पालक संघ यांचे सहकार्य घेणे आवश्यक आहे व ते घ्यावे व सभेचे आयोजन करणे. गुरुपौर्णिमा उपक्रम आयोजित करणे. इयत्ता पाचवी व आठवी यांची शिष्यवृत्ती वर्ग सुरू करून त्याबाबत या परीक्षेसाठी विद्यार्थी परीक्षेत बसवणे. इयत्ता पाचवीतील वर्गासाठी नवोदय विद्यार्थ्यांची निवड परीक्षा नियोजन करून पायाभूत चाचणी क्रमांक एक चे आयोजन करणे तसेच जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ चे परीक्षेचे कामकाज करणे. जुलै महिन्यातील पुरवणी परीक्षेत नापास होणारे विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी म्हणून फॉर्म भरणे व मंडळाकडे सादर करणे.


3) मुख्याध्यापकाचे ऑगस्ट महिन्याचे कामकाज नियोजन:-

स्टुडन्ट माहिती पोर्टलवर ऑनलाइन भरणे. शिक्षक- पालक संघाची सभा घेणे. शाळा व्यवस्थापन समितीचे आयोजन करणे त्याच संदर्भाने रेकॉर्ड अद्यावत ठेवणे. या महिन्यामध्ये राष्ट्रीय सण म्हणून स्वातंत्र्य दिन पूर्वतयारी नियोजन मुख्याध्यापकाला आखणे आवश्यक असते कारण हा राष्ट्रीय सण आहेत. हा सण साजरा करणे. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन असल्यामुळे याबाबत अतिदक्षता घेऊन नियोजन तयार करून संपूर्ण कामकाज यशस्वी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची असल्यामुळे मुख्याध्यापकाने कर्तव्यदक्ष राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या महिन्यांमध्ये सरल स्कूल पोर्टल भरणे व सरल स्टॉप पोर्टल भरणे. श्रीकृष्ण जयंतीनिमित्त गोपाल काला व दहीहंडी उपक्रम राबवणे. आकारिक चाचणी क्रमांक एक चे आयोजन करून चाचणी घेणे. 


प्रगत व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी ज्यादा तासाचे आयोजन करणे. एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करणे. राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी रक्षाबंधनासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करणे. जवळच्या परिसरामध्ये एखाद्या सहलीचे नियोजन करणे व वरील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांची सभा घेऊन कामकाजाचे वाटप व नियोजन यानुसार कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला किंवा नाही याची तपासणी करणे म्हणजे याला आपण सिंहलोकन असे म्हणतो ते करणे आगस्ट महिन्यात अत्यंत महत्त्वाचे आहेत. ऑगस्ट महिना हा सणाचा माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या महिन्याचे नियोजन काटेकोरपणे नियोजन करून बजावणे आवश्यक आहेत.

4) मुख्याध्यापकाचे सप्टेंबर महिन्याचे कामकाजाचे नियोजन:-

माता- पालक संघ सभा आयोजन करणे. संच मान्यता करून घेण्यासाठी पोर्टल वर माहिती भरणे आणि त्याबाबतची सर्व कल्पना आपल्या शिक्षकासोबत सभेचे आयोजन करून संच मान्यता चे कामकाज अद्यावत नियोजन करणे. शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेणे. शाळेत गणेश उत्सव साजरा करणे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला वाव देण्यासाठी वादविवाद सभा किंवा भाषण स्पर्धा चे आयोजन करणे. शालेय पोषण आहार समितीची सभा घेऊन संपूर्ण अहवाल तपासणी करणे. त्याचबरोबर मीना राजू मनसेची सभा पण घेणे.


 प्रत्येक महिन्याला पालक सभेचे आयोजन करणे. विद्यार्थ्याचे विविध लाभांबाबत शिष्यवृत्तीचे व उपस्थिती भत्तांचे फॉर्म भरणे. अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती चे फॉर्म ऑनलाईन भरणे हे फॉर्म फक्त अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे भरणे आवश्यक असते. अल्पसंख्यांक मधील विद्यार्थ्यांची निवड करणे व फॉर्म भरणे ही जबाबदारीची नियोजन मुख्याध्यापकाचे असते. घेतलेल्या पायाभूत चाचणीचे गुणदान ऑनलाईन मार्क भरणे. प्रगत व अप्रगत विद्यार्थी यांची निवड करून अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी नियोजन करणे तसेच प्रगत विद्यार्थ्यांसाठी आणखी विशेष स्पर्धात्मक परीक्षा बाबत कामकाज करणे. 


त्याचबरोबर समाज कल्याण विभागाच्या संबंधित असणाऱ्या लाभार्थी शिष्यवृत्ती फॉर्म ऑनलाईन भरणे. अध्ययन निष्पत्ती उपक्रम राबवणे. 5 सप्टेंबरला शिक्षक दिनाची पूर्वतयारी करून यशस्वीरित्या शिक्षक दिन साजरा करणे. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांना  बक्षीस देणे. आदर्श शिक्षक म्हणून निवड करणे त्याचबरोबर 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा करणे.

5) मुख्याध्यापकाचे ऑक्टोंबर व नोव्हेंबर या महिन्याच्या कामाचे नियोजन:-

दोन्ही महिन्याचे उपक्रम आपण एकत्र नियोजन करणे आवश्यक आहे कारण या महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्ट्या बाबत नियोजन करावे लागत असते. माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरणे. 15 ऑक्टोंबर ला वाचन प्रेरणा दिन साजरा करणे. विद्यार्थ्यांची सत्र क्रमांक एक परीक्षा घेणे व परीक्षा विभागाकडून हे संपूर्ण नियोजनबद्ध कामकाज मूल्यमापनासह पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास नवरात्र दिवसात परिसर आयोजन करणे. शाळा स्वच्छता अभियान राबवणे. शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेऊन रेकॉर्ड करणे. या महिन्यात दिवाळीची सुट्टी विचारात घेऊन विद्यार्थ्यांसाठी दिवाळी अभ्यासाचे नियोजन प्रत्येक शिक्षकाकडून खाते वाटप करून घेणे आवश्यक आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरला साजरी करणे तसेच नवरात्र उत्सव निमित्त भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करून याच कार्यक्रमासोबत चित्रकला स्पर्धेचे सुद्धा आयोजन करणे आणि नवोदय व शिष्यवृत्तीचे ऑनलाईन फॉर्म भरणे हे काम या महिन्याच्या नियोजनात पूर्ण करणे आवश्यक असल्याने जे विद्यार्थी परीक्षेला बसण्यास तयार आहे त्या सर्वांचे फॉर्म भरून पूर्ण करणे. शैक्षणिक सहलीची पूर्वतयारी करणे. 


क्रीडा स्पर्धा ची पूर्वतयारी करणे. जिल्हास्तरावर राज्यस्तरावर व विभागीय स्तरावर क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड करणे व क्रीडा स्पर्धेत भाग घेणे विद्यार्थ्यांना आवश्यक असते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ज्या खेळाचा छंद किंवा आवड आहे अशा विद्यार्थ्यांची निवड करून सराव करून घेणे व स्पर्धेसाठी निवड करणे, क्रीडा स्पर्धेसाठी. पायाभूत चाचणी क्रमांक दोन चे आयोजन करणे. शिक्षक पालक संघाची सभा घेणे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जयंती 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन म्हणून साजरी करणे व ऑक्टोबर महिन्यात 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभाई पटेल जयंती कार्यक्रमाचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या दिवाळी च्या सुट्ट्याची नियोजन ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातच करणे आवश्यक आहे.


6) मुख्याध्यापकाचे डिसेंबर महिन्याचे कामकाज नियोजन:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची परीक्षेच्या बाबत प्री लिस्ट ऑनलाइन तपासून बोर्डाकडे पाठवणे. माता पालक संघा ची सभा घेणे. या महिन्यांमध्ये सर्व शालेय समित्यांच्या सभेचे आयोजन करून संपूर्ण रेकॉर्ड प्रोसिडिंग सह तयार ठेवणे कारण शाळा तपासणीच्या दृष्टिकोनातून शालेय अभिलेखे अद्यावत ठेवण्याचे नियोजन करणे व क्रीडा व कला सभेचे आयोजन करणे. शैक्षणिक सहलीचे आयोजन शिक्षण विभागाकडून मान्य करून घेणे. तसेच ऑनलाईन यु-डायस प्लस भरणे. शाळेचा वार्षिक आराखडा भरणे. शाळा तपासणीसाठी योग्य ती पूर्वतयारी याच महिन्यात करून घेणे आणि अध्ययन निष्पत्ती उपक्रम सुद्धा राबवणे.


7) मुख्याध्यापकाचे जानेवारी महिन्याचे कामाचे नियोजन:-

शिक्षक पालक संघाची सभा घेणे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी घेऊन साजरा करणे. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे. आनंदमय वातावरणामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करणे. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करून सांस्कृतिक कार्यक्रम घेणे. कदाचित वेळ मिळाल्यास बाल आनंद मिळावा घेणे. 


या महिन्यामध्ये स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आणि सुभाष चंद्र बोस जयंती साजरी करणे याबाबत नियोजन असणे आवश्यक आहे तसेच या महिन्यांमध्ये इयत्ता पाचवी व आठवीसाठी सराव प्रश्नपत्रिका चे आयोजन करणे.


8) मुख्याध्यापकाचे फेब्रुवारी महिन्याचे कामाचे नियोजन-

माता पालक संघ सभा घेणे. शालेय पोषण आहार सभा घेणे. पालक सभेचे आयोजन करणे. इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा नियोजन करणे. आकारिक चाचणी क्रमांक दोन चे आयोजन करणे. शाळा वार्षिक तपासणी पूर्वतयारी करणे. 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करणे. यु-डायस प्लस ऑनलाईन भरणे. माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा व लेखी परीक्षा संबंधित नियोजन करून त्याबाबत मंडळाला सहकार्य करणे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देणे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षे चे केंद्र असल्यास केंद्र पूर्वतयारी करणे व केंद्र संचालक म्हणून कामकाज पाहणे. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावीची परीक्षा याच महिन्यात सुरू होत असते. त्यादृष्टीने महाराष्ट्र बोर्ड ला मदत करणे व सहकार्य करणे. लेखी व तोंडी परीक्षेचे रेकॉर्ड अद्यावत करणे.


9) मुख्याध्यापकाचे मार्च महिन्याचे कामकाजाचे नियोजन-

शिक्षक- पालक संघाची सभा घेणे. शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेणे. शाळेची वार्षिक तपासणी करणे. जे जे विद्यार्थी ज्या ज्या परीक्षेला बसलेले असतील त्या परीक्षेबाबत निरोप समारंभ देऊन भावी जीवनाची यशस्वी वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन देणे त्यासाठी निरोप समारंभाचे कार्यक्रमाचे आयोजन करणे. समग्र शिक्षा अभियान खर्च वार्षिक विनियोग व जमाखर्चाची नोंद ठेवून ऑडिट करून घेणे. 31 मार्च च्या आत ऑडिट करून घेणे. 


तसेच शिक्षकांचे आयकर फॉर्म भरून शिक्षण मंडळाला सादर करणे. एस एस ए ऑनलाइन लिंक भरणे. आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करणे. शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देऊन यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देणे.


चार मार्च रोजी संत गाडगेबाबा जयंती साजरी करणे. 12 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण जन्मदिवस साजरा करणे. 17 मार्च रोजी जागतिक अपंग दिन साजरा करणे. शालेय परीक्षेचे संपूर्ण नियोजन करून वर्गणी आहे वेळापत्रकानुसार सत्र परीक्षा क्रमांक दोन पर्यंत वार्षिक परीक्षेच्या नियोजन करून त्यांना अभ्यास देऊन पूर्ण करून घेणे व परीक्षा घेणे हे महत्त्वाचे काम करावे लागते तसेच या महिन्यांमध्ये जर एखाद्या शाळेला परीक्षा केंद्र असेल तर केंद्र संचालक म्हणून सर्व परीक्षेची जबाबदारीत्मक कामकाज पूर्ण करणे. शांत वातावरणात परीक्षा घेणे.


10) मुख्याध्यापकाचे एप्रिल महिन्याचे कामकाजाचे नियोजन.:-

माता पालक संघ सभा घेणे. शालेय पोषण आहार सभा घेणे. दुतीय सत्र परीक्षा घेणे. पायाभूत चाचणी क्रमांक तीन परीक्षा घेणे. मॉडरेशन तयारी करणे. विविध परीक्षांचे पेपर तपासणीचे काम पूर्ण करून निकाल तयार करणे. इयत्ता दहावी आणि बारावीचे पेपर तपासणी करण्याचे कामकाज ज्या शिक्षकांची नियुक्ती झाली असेल त्या शिक्षकाकडून शाळेत पेपर तपासणी करून घेणे. 


शालेय पोषण आहार वार्षिक अहवाल तयार करणे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल रोजी साजरी करणे. नवोदय नवोदय परीक्षा इयत्ता पाचवी ची घेणे.  आर टी इ केंद्र बोर्ड परीक्षा पाचवी व आठवीची घेणे. व एप्रिल महिन्यामध्ये सर्व रेकॉर्ड अद्यावत तयार करून ठेवू नये व प्रोसिडिंग सूचना वही अभिलेखे आवक जावक स्टॉक रजिस्टर मेंटेन करणे अतिशय महत्त्वपूर्ण कामकाज या महिन्यात पार पाडावे लागते म्हणून त्याचे नियोजन करणे.

11) मुख्याध्यापकाचे मे महिन्याचे कामकाज नियोजन:-

एक मे महाराष्ट्र दिन साजरा करणे.. इयत्ता एक ते नऊ तसेच इयत्ता अकरावी परीक्षा चे निकाल जाहीर करणे.

शिक्षकांची वार्षिक सभा घेऊन पुढील वर्षाचे वर्ग वाटप करून देणे. शिक्षक कामकाज वाटप व लोक बुक भरणे. वृक्ष लागवडीची माहिती ऑनलाईन भरणे. उन्हाळ्याच्या सुट्टीतील शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम शासकीय स्तरावरून आयोजित केल्यास संबंधित शिक्षकांना प्रशिक्षणास पाठवणे. प्रशिक्षण तयारी व होणाऱ्या अभ्यासक्रम बदलाबाबत नियोजन करून उन्हाळ्याच्या सुट्टीचे शासकीय नियमाप्रमाणे नियोजन करून शिक्षकांना सुट्टी देणे. 


पुढील वर्षाचे शैक्षणिक नियोजन करणे मुख्याध्यापकाला करावी लागते. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उन्हाळ्याची सुट्टी नसल्यामुळे इतर राहिलेले कामे संपूर्ण पूर्ण करणे व उन्हाळ्याच्या सुट्टीत येणारे शासकीय आदेश संबंधित शिक्षकांकडे आदेश देणे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या वर्गात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करावी.

सारांश:-

शाळेचा मुख्याध्यापक खरा शाळेचा व्यवस्थापक प्रमुख आहे परंतु तो एकमेव व्यवस्थापक नव्हे हे अनियंत्रित राजशाहीचे प्रशासन नाही. केलेल्या वरील कार्यालयाचे नियोजन करून कार्य विभागणीचे तत्व स्वीकारून पदाधिकारी समित्या परिषदा व्यक्ती समाज संस्था विद्यार्थी पालक देणगीदार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे काम करणारे विकेंद्रीकरणाचे तत्व चा वापर करून आपले नियोजन जर मुख्याध्यापकाने यशस्वी केले तर ती शाळा महाराष्ट्रात अद्यावत शाळा म्हणून जाहीर होईल व अशा शाळेत आयएसओ प्रमाणपत्र सुद्धा मिळेल म्हणून मुख्याध्यापकाने आपले नियोजन तयार करणे आवश्यक आहे व नियोजनाप्रमाणेच कामकाज करणे हेही आवश्यक आहे.


FAQ

1) विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके कोणत्या दिवशी वाटत होते?

शाळा सुरू झाल्या च्या पहिल्या दिवशी.


2) लॉग बुक चा वापर काय आहे?

शिक्षकांचे पाठ निरीक्षण करण्यासाठी ‌.


3) शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी काय करावे लागते?

शंभर टक्के पट नोंदणी.


4) आर्थिक वर्षाची शेवटची तारीख सांगा.

31 मार्च.


5) फोन नंबर 16 कशाच्या बाबतीत आहे?

आयकराच्या बाबतीत आहे.


अधिक माहितीसाठी आपण आमचा यूट्यूबचा मुख्याध्यापक कार्य लाईव्ह स्ट्रीम व्हिडिओ पहा.



अधिक माहितीसाठी आमचे खालील लेख आवश्यक वाचा.

१) नवीन शैक्षणिक धोरण.

२) नागपंचमी सणानिमित्त मराठी माहिती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation