Type Here to Get Search Results !

कृती संशोधन मराठी माहिती | Research action in Marathi information

 कृती संशोधन मराठी माहिती| Research action in Marathi information

प्रस्तावना

मित्रांनो, मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे. आजचा मुख्य विषय "कृती संशोधन"हा आहे या विषयावर दैनंदिन अध्ययन- अध्यापन करताना अनेक समस्या निर्माण होतात. अध्ययन- अध्यापन करताना निर्माण होणाऱ्या समस्यावर शास्त्रीय पद्धतीने उकल करण्याच्या प्रक्रिया बाबत सविस्तर माहिती या लेखातून स्पष्टपणे नमूद केली आहेत.

कृती संशोधन मराठी माहिती
कृती संशोधन मराठी माहिती



 कृती संशोधन(toc)

संकल्पना

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कृती संशोधन किंवा ज्याला आपण नवोपक्रम असे म्हणतो. त्याबाबत संपूर्ण माहिती आपणास प्राप्त व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हा लेख लिहिण्यास सुरुवात केली आहे. जगातील कोणतेही क्षेत्र घ्या त्या क्षेत्रामध्ये व्यक्तीला समस्या निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आणि निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी स्वतःनेच प्रयत्न करणे आवश्यक असते. म्हणजेच समस्या निर्मिती झाल्यानंतर शास्त्रीय पद्धतीने समस्या सोडवण्याच्या पद्धतीमध्ये कृती संशोधन हे अतिशय महत्त्वाचे असते. आपण शैक्षणिक क्षेत्रातील कृती संशोधन या संबंधानेच माहिती या लेखात नमूद करणार आहे. दैनंदिन अध्यापनात येणाऱ्या अडचणीवर शास्त्रीय पद्धतीने उकल करून निष्कर्षापर्यंत पोहोचणे म्हणजेच साध्या भाषेत त्याला आपण कृती संशोधन असे म्हणतो. शिक्षण शास्त्रामध्ये कृती संशोधनाला व नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कृती संशोधनाला प्राधान्याने स्थान प्राप्त झालेले आहेत. म्हणजेच शास्त्रीय पद्धतीने समस्या सोडवण्याला कृती संशोधन असे सोप्या भाषेत म्हणतात.

कृती संशोधनाचा उगम

सर्वसाधारणपणे कृती संशोधनाचा उगम 1946 मध्ये या विषयावर अनेक शास्त्रज्ञांनी आपापले मत मांडून कृती संशोधन या विषयावर लिखाण केले आहे. कृती संशोधन ही संकल्पना चा उगम सर्वप्रथम कर्ट या शास्त्रज्ञाने उगम कसा झाला याबाबत माहिती प्रतिपादन केली आहे. त्यांनी 1946 मध्ये सैद्धांतिक विषयात मांडणी केली. त्यांच्या मते निर्माण होणाऱ्या समस्या ह्या अनेक टप्प्यातून उगम पावतात व शेवटी त्यातून चांगले वाईट निष्कर्ष येतात. खरे तर ही शास्त्रीय पद्धत आहे. म्हणून कृती संशोधनाचे आपणास टप्पे माहीत पाहिजे असे शास्त्रज्ञाने मत व्यक्त केले.

कृती संशोधनाचे टप्पे

कृती संशोधन हे शास्त्रीय स्वरूप असल्यामुळे याबाबतचा कृती संशोधन आराखडा युक्त कृती होणे गरजेचे आहेत. त्यासाठी कृती संशोधनाचा आराखडा टप्प्याच्या स्वरूपात मांडून त्याचे विवेचन केले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात व्यक्तीला समस्या निर्माण झाल्यानंतर तिचे जोपर्यंत निराकरण होत नाही तोपर्यंत हे कार्य सतत सातत्य स्वरूपाचे आहेत. यासाठी नेहमी नेहमी प्रयोग करणे आवश्यक असते. म्हणून समस्येचे निराकरण करण्यासाठी चार टप्पे महत्त्वाचे आहेत.

1)नियोजन

2)कृती

3)निरीक्षण

4)प्रत्याभरण

शैक्षणिक क्षेत्रातील सहजगत्या निर्माण होणारी समस्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा वरील चार टप्प्यातून ही प्रक्रिया सतत सुरू ठेवावी लागते.

नियोजन

समस्या निर्माण झाल्यानंतर व्यवस्थितरित्या समस्येचे नियोजन करणे गरजेचे असते कारण नियोजनाशिवाय कोणताही प्रश्न किंवा उद्दिष्ट साध्य करणे सोपे नसते . कृती संशोधनामध्ये नियोजन करणे. नियोजन केल्यामुळे उद्दिष्ट पर्यंत जाणे सोपे होते.

कृती

नियोजन नंतर कृती संशोधनासाठी प्रयोगात्मक अनेक पद्धतीने कृती करावी लागते.कृती कृतीमध्ये समस्येवर उकल करण्यासाठी कृती करणे आवश्यक असते. यासाठी कृती आराखडा तयार करणे आवश्यक असते ‌ कृतीमध्ये निरनिराळ्या पद्धतीने माहितीचे संकलन करून त्या माहितीचे पृथकरण किंवा वर्गीकरण करावे लागते. म्हणजे प्रथम माहिती संकलित स्वरूपात नसते ती संकलित स्वरूपात एकत्रित करून वर्गीकरण गणितीय भाषेमध्ये किंवा सर्वेक्षण करून मांडणी करावी लागते.

निरीक्षण

केलेल्या कृतीमुळे आपणास माहिती सुव्यवस्थित मांडल्यानंतर माहितीचे निरीक्षण करणे व ते निरीक्षण ज्या स्वरूपात प्राप्त होईल त्या स्वरूपात निरनिराळ्या निरीक्षणाच्या नोंदी येणे गरजेचे असते. कृती संशोधनामध्ये निरीक्षण ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

प्रत्याभरण 

यालाच आपण फीडबॅक असे सुद्धा म्हणतो इंग्रजीमध्ये. नियोजन नियोजनातून, कृती कृतीतून, निरीक्षण आणि निरीक्षणावरून निर्माण झालेल्या निष्कर्ष व त्याचे प्रत्याभरण ही एक संकीर्ण स्वरूपाची बाब आहे किंवा प्रक्रिया आहे.

याचाच अर्थ असा स्पष्ट होतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये दैनंदिन कार्यात जाणवणाऱ्या समस्या शास्त्र व शुद्ध पद्धतीने म्हणजेच उपयुक्त चार टप्प्यातून जाऊन ती समस्या सोडवणे हे कार्य कृती संशोधन या प्रक्रिया मार्फत पूर्ण होते. म्हणूनच कृती संशोधनाची व्याख्या आपणास पुढील प्रमाणे करता येईल.

कृती संशोधनाची व्याख्या

दैनंदिन अध्ययन अध्यापन करत असताना सहजगत्या निर्माण होणारी समस्या आणि ही समस्या शास्त्रीय पद्धतीने उपचारात्मक पद्धतीने उकल करण्याची प्रक्रिया म्हणजेच कृती संशोधन होय.

शैक्षणिक क्षेत्रात कृती संशोधनाला महत्त्व असल्यामुळे प्रत्येक शिक्षकाने कृती संशोधन हा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानून आपणासमोर निर्माण होणाऱ्या समस्या शास्त्रीय पद्धतीने सोडवणे गरजेचे आहे.

कृती संशोधनाची क्षेत्रे

कुट्टी संशोधनासाठी समस्या निश्चित झाल्यानंतर त्या समस्येसाठी म्हणजेच ती समस्या सोडवण्यासाठी आपणास मर्यादित स्वरूपाचे उद्दिष्टे समस्येच्या बाबतीत लक्षात येणे गरजेचे आहे. कृती संशोधनाची क्षेत्रे अनेक आहे. या क्षेत्रावर आधारित शैक्षणिक व्यवहारात समस्या निर्माण झाली तर सोडवणे गरजेचे आहे. कृती संशोधन ज्या विषयावर किंवा ज्या क्षेत्रावर करायचे आहे ते अनेक क्षेत्र पुढील प्रमाणे आहेत.

विद्यार्थी

अध्ययन

अध्यापन

अभ्यासक्रम

पाठ्यपुस्तके

प्राकृतिक परिस्थिती

शालेय विषय

सहशालेय कार्यक्रम

समाज व समाज संबंध

मूल्यमापन

विविध आंतरक्रिया

शैक्षणिक क्षेत्रात वरील विषयावर अध्ययन अध्यापन करताना समस्या निर्माण झाली तर ती सोडवण्यासाठी आपणास कृती संशोधन चा प्रकल्प राबवावा लागतो. आणि हा प्रकल्प शास्त्रीय पद्धतीने राबवावा लागतो.

प्रश्न पहिला आहे की समस्या तुमची स्वतःची असावी. ओढून काढून आणलेली नसावी. सहज सहज रित्या निर्माण झालेली समस्या सोडवणे सोपे असते. ज्याची समस्या असेल त्यांनीच त्या विषयावर समस्या सोडवण्यासाठी कृती संशोधनाचा प्रकल्प हाती घेणे.

कृती संशोधनाचा पहिला पाया

समस्या निर्मिती झाली पाहिजे.

समस्या निर्मिती झाल्यानंतर समस्या सोडवण्यासाठी मर्यादित उद्दिष्टे निश्चित केली पाहिजे ‌

समस्येची निर्मिती कशी झाली हे पण मुद्दे विशद करणे आवश्यक आहे.

समस्या ही तात्कालीक स्वरूपाची असावी.

समस्या ही वैयक्तिक स्वरूपाची असावी ‌.

समस्या निश्चित झाल्यानंतर संशोधनाचा नमुना निवडणे वर्ग निवडणे किंवा एखादी तुकडी निवडणे किंवा काही विशिष्ट प्रायोगिक गट निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.

संशोधन प्रकल्प राबवल्यामुळे आपल्याला आपल्या कार्याचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विचाराची परिणामकारकता पडताळण्यासाठी वस्तुनिष्ठ मूल्यमापन व निर्दोष कार्य होणे आवश्यक आहे त्यासाठी आपणास कृती संशोधन प्रकल्प राबवताना पुढील मुद्द्यांच्या आधारे कृती संशोधनाचा आराखडा तयार करणे. समस्या निर्माण झाल्यानंतर ती सोडवण्यासाठी कृती संशोधनाचा आराखडा तयार करणे आवश्यक असते.

 कृती संशोधनाचा आराखडा

कृती संशोधनाचा आराखडा तयार करताना क्रमाक्रमाने अनुक्रमे खाली दिलेल्या क्रमानेच आपण योग्य कार्यवाही करून कृती संशोधनाचा आराखडा तयार करावा म्हणजे आपणास कृती संशोधन राबवणे सोपे जाईल.

समस्येची जाणीव

समस्येचे गृहितके

समस्येची परिकल्पना

समस्येची शून्य कल्पना

समस्येची निश्चिती

समस्येची आवश्यकता

समस्येची मर्यादा

समस्येचे क्षेत्र

समस्येच्या कार्यात्मक व्याख्या

संशोधनाची पद्धत

कृती संशोधनासाठी वेळापत्रक

समस्येविषयी शोध व सुस्पष्टता

कृती संशोधनाचा आराखडा

कृती संशोधनाची कार्यवाही

मुलाखती

चाचण्या

माहितीचे विश्लेषण

विश्लेषणाचा अहवाल लेखन

निष्कर्ष

निष्कर्षाचे उपयोजन किंवा प्रत्याभरण

आपण कृती संशोधन करत असताना कृती संशोधनाच्या बाबत गणिती हे माहिती संख्याशास्त्राचा आधार घेऊन विश्लेषण व पृथकरण करू शकता आलेख व आलेखाचे स्पष्टीकरणही करू शकता.

समस्या ही इतर प्रकल्पांनी किंवा संशोधकांनी मांडलेल्या समस्येपेक्षा वेगळ्या प्रकारची कशी आहे हे संशोधकाला माहित पाहिजे आणि त्याने माहिती विशद करणे आवश्यक आहे. कृती संशोधन राबवण्याच्या निर्णया पद्धती आहे. ऐतिहासिक पद्धत , वर्णनात्मक पद्धत, प्रायोगिक पद्धत, नमुना पद्धत, सर्वेक्षण पद्धत.

अशा कितीतरी संशोधन करण्यासाठी पद्धती उपलब्ध आहेत. मित्रांनो हे लक्षात असू द्या कृती संशोधन करणे म्हणजेच आपण एक प्रकारचा प्रकल्प लिहीत असून हा पीएचडी स्वरूपाचा नमुनाच असतो. कृती संशोधन राबवण्यास पीएचडी करणे सोपे जाते. आता शालेय अध्यापन शास्त्रामध्ये कृती संशोधन हा प्रकल्प राबवणे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आवश्यक केले आहेत.

कृती संशोधन प्रकल्प कार्यवाही

प्रथम समस्येची जाणीव निर्माण झाल्यानंतर कार्यवाहीला सुरुवात करणे, ध्येय, उद्दिष्ट, अडचणी ,निर्माण होणारे प्रश्न, आत्मविश्वास ,प्रत्यक्ष काम, प्रात्यक्षिक कार्य आणि करावयाच्या कृत्या ,ज्यातून आपल्याला आपल्या समस्येची उत्तरे मिळेल असे सुरू निश्चित करून समस्या विषयी कारणाची यादी तयार करावी. समस्या निर्माण झालेली ज्या कारणाने निर्माण झाली ते सर्व कारणे नमूद करणे आवश्यक आहे. समस्येची कारणे निश्चित केल्यानंतर समस्येची क्षेत्र ही निश्चित करून घ्या म्हणजे पुढे आपणास कृती संशोधन करताना कोणती अडचण येणार नाही. कृती संशोधनाची ठरवलेली समस्या निश्चित झाल्यानंतर त्याबाबत योग्य तुमचे मत मांडा.

उदाहरणार्थ समस्या पुढील प्रमाणे निर्माण होणे आवश्यक आहे.

समस्या 

"महात्मा गांधी विद्यालय सोलापूर येथील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी स्पेलिंग मध्ये होणाऱ्या चुका चा शोधात्मक अभ्यास व उकल" ही झाली . अशा समस्येवर आधारित प्रकल्प राबवणे गरजेचे असते.

वरील प्रमाणे कितीतरी अनेक समस्या शैक्षणिक क्षेत्रात अध्यापन करताना निर्माण होतात किंवा अध्ययन करताना निर्मा ण होतात आणि त्या सोडवण्यासाठी केलेला अट्टाहास म्हणजे कृती संशोधन.

आपल्या समस्येची कार्यवाही करताना आपल्या सोबतच्या शिक्षक मित्राशी ही समस्येबाबत चर्चा करून कार्यवाहीला सुरुवात करावी कारण समस्येविषयी शोध व सुस्पष्टता येणे त्यामुळे सोपे जाते. कृती संशोधनाचा आराखडा व आराखड्याचे उद्दिष्ट आणि त्यावर आधारित परिकल्पना निश्चित करणे सोपे जाते गृहीतके मांडणे सोपे जाते जसे गणितामध्ये उदाहरणार्थ प्रमेय सिद्ध करताना प्रथम आपण गृहितके गृहीत धरतो आणि नंतर प्रमय सोडण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे कृती संशोधनामध्ये आराखडा लिहिताना गृहीतके मांडणे आवश्यक आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या परिकल्पना सुद्धा तुम्ही मांडू शकता. उदाहरणार्थ इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याला इंग्रजी वाचता येत नाही ही तुमची शुन्य परिकल्पना होय. ज्यावेळेस तुम्ही कृती संशोधन प्रकल्प राबवल्या नंतर असे सिद्ध झाले की मुलांना इंग्रजी वाचता येते म्हणजे तुमची समस्या साध्य झाली म्हणजे शुन्य परिकल्पनेतून आपण बाहेर पडलो. त्यानंतर कृती संशोधनासाठी साधन निश्चिती करणे हेही सुद्धा आवश्यक आहे. साधने म्हणजे संशोधनासाठी प्रश्नावली, मुलाखती, निरीक्षण पद्धती, अभिरुद्धी ,मापिका प्रश्नपत्रिका

साधनाच्या साह्याने माहितीचे संकलन करणे आणि नंतर पृथकरण करणे व त्या पृथकरणावर केलेल्या कार्यवाहीतून कृती संशोधनाची कार्यपद्धती ठरवणे आवश्यक असते. उदाहरणार्थ कृती संशोधनासाठी आपण सर्वेक्षण पद्धतीचा वापर केला असेल तर सर्वेक्षणातून प्राप्त होणारी माहिती आणि त्या माहितीचे नमुने आणि विश्लेषण तसेच वर्गीकरण आणि पृथकरण या समस्या पद्धतीतून नमुन्याच्या आधारे आपणास आपले ध्येय गाठता येते. संशोधनाच्या माहितीचे विश्लेषण सुस्पष्ट झालेले असावे. कारण त्यावर आधारित संख्याशास्त्रा च्या साह्याने मध्यांक, मध्यंमान, बहुलक, सरासरी किंवा आलेख या आधारे माहिती सुस्पष्ट मांडता येते. याचाच अर्थ असा होतो की कृती संशोधन प्रकल्पामध्ये संख्याशास्त्रा चे ज्ञान असणे सुद्धा आवश्यक आहे

प्रकल्पाची कार्यवाही करताना संपूर्ण उपयुक्त चर्चा झाल्यानंतर कार्यवाहीचा वेळापत्रक सुस्पष्ट तयार करणे. ज्याप्रमाणे आपण शाळेचा वेळापत्रक तयार करतो आणि त्याप्रमाणे शाळा चालवतो तशाच प्रकारे संशोधन करताना म्हणजेच कृती संशोधन करताना वेळापत्रकाप्रमाणे निश्चित करून गट कधी निवडायचा साधने कशी तयार करायची सामग्रीचे संकलन कसे करायचे, सामग्रीचे पृथकरण कसे करायचे, अहवाल लेखन व टंकलेखन कसे करायचे आणि अहवालाचे सादरीकरण कसे करायचे याचे निश्चित टप्पे वेळापत्रकात दर्शविण्यात आलेले असावे.

सर्वसाधारणपणे कृती संशोधनाचा आराखडा लेखन करून तो योग्य व्यक्तीकडून तपासून घेऊन नंतरच टंकलेखित करावा.

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-4840461812642612"

     crossorigin="anonymous"></script>

कृती संशोधन संपूर्ण आराखडा लेखन

कृती संशोधनाचा आराखडा लेखन पुढील प्रमाणे करण्यात यावे.

कृती संशोधन आराखडा

प्रास्ताविक

समस्येचे शीर्षक

समस्येची पूर्वतयारी

समस्येची उद्दिष्टे

समस्येची परिकल्पना

समस्येची संशोधन पद्धत

सामग्री संकलन व साधने

समस्येची योग्य कार्यवाही

सामग्री विश्लेषण

संशोधन वेळापत्रक

जाणवलेले बदल

निष्कर्ष

परिशिष्टे

प्रमाणपत्र

संपूर्ण कृती संशोधन प्रकल्प राबवल्यानंतर संशोधकाला प्रमाणपत्र सादर करावी लागतात की मी माझा हा प्रकल्प यापूर्वी कोणत्याही स्पर्धेसाठी सादर केलेला नाही.

टंकलेखन नियम

कृती संशोधन प्रकल्प ए फॉर कागदावर लिहिण्यात यावा.

प्रकल्प लेखन काम करण्यासाठी बॉण्ड पेपरचा वापर करावा ‌‌.

प्रकल्प मागील पानावर लिहू नयेत समोरील पानावरच लिहिणे

प्रकल्पास आकृत्या व फोटो यांची पुरावे आवश्यक जोडणे लिखाण शैली ही मराठीच्या नियमानुसार लिहिलेली असावी. लिखाण काम करताना कोणतीही चूक करू नये. स्पर्धेसाठी प्रकल्प पाठवायचा असेल तर चार प्रतीत तयार करून सादर करावा.

सारांश

 संपूर्ण कृती संशोधन प्रकल्प राबवल्यानंतर समस्येपासून तर निष्कर्ष पर्यंत उपरोक्त दर्शविलेल्या माहितीप्रमाणे आपला प्रकल्प तयार झालेला असावा अशी इच्छा असते. विविध संस्थेमार्फत तसेच शासनामार्फत जिल्हा परिषद मार्फत आणि डीएड आणि बीएड कॉलेज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत कृती संशोधन किंवा नवोपक्रम या विषयावर स्पर्धा आयोजित केली जाते आपण त्या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षीस प्राप्त करावे या उद्देशाने हा लेख लिहिण्याचा माझा प्रस्तुत प्रकल्प होता म्हणून आपण कृती संशोधन स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठीच हा लेख लिहिण्याचा उद्देश आपण सफल करावा. प्रकल्पाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ तसेच प्रकल्पाची बांधणी व्यवस्थितरित्या करण्यात यावी आणि संपूर्ण प्रकल्प लिखाण काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प तज्ञ व्यक्तीकडून तपासून घ्यावा कारण अनेक चुका असेल तर त्या दुरुस्त होतील व आपणास स्पर्धेसाठी हा प्रकल्प पाठवण्यास सोपा जाईल ‌. दरवर्षी कृती संशोधन आराखडा लेखन स्पर्धा शासनामार्फत आयोजित करून बक्षीस देण्यात येतात व आदर्श शिक्षक म्हणूनही सुद्धा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी हा प्रकल्प आपणास उपयुक्त ठरेल त्यासाठी हा लेख लिहिण्याचे संपूर्ण माझे प्रयोजन पूर्ण केले आहे.

FAQ

1) कृती संशोधन ही संकल्पना कोणत्या वर्षी उगम पावली?

1945.

2) कृती संशोधनाची संकल्पना कोणी मांडली!

कर्ट लेविन.

3) कृती संशोधन म्हणजे काय?

दैनंदिन अध्ययन अध्यापनामध्ये निर्माण होणारी समस्या चे शास्त्रीय पद्धतीने उकल करणे व निष्कर्ष मांडणे म्हणजे कृती संशोधन होय.

4) कृती संशोधनाचे किती टप्पे आहेत?

चार टप्पे.

5) कृती संशोधनाची सर्वात सोपी पद्धत कोणती?

प्रायोगिक पद्धत.

6) कृती संशोधनासाठी कमीत कमी किती उद्दिष्टे असावी?

चार किंवा पाच.

7) कृती संशोधन लिखाण काम करण्यासाठी कोणता कागद  वापरण्या त यावा?

ए फॉर बॉंड पेपर 

आमचे इतर खालील लेख आवश्यक वाचा.

 01ऑक्टोबर पासून आधार कार्ड बाबत नवीन नियम 

पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती 2023

 महाराष्ट्रातील आरक्षण सविस्तर माहिती

रक्षाबंधन माहिती मराठी

गंगापूर धरणाची मराठी माहिती



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation