Type Here to Get Search Results !

शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता व आहर्ता निश्चित करणारा शासन निर्णय..|The educational and professional qualification of the teacher GR

 

शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता व  अहर्ता निश्चित करणारा शासन निर्णय.|The educational and professional qualification of the teacher GR

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता निश्चित करण्यासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2019 रोजी एक शासन निर्णय सुधारित शुद्धिपत्र म्हणून निर्गमित केला आहे. या शासन निर्णयाने शिक्षकाची पात्रता व व्यवसायिक पात्रता निश्चित करणारे हे शुद्धिपत्र म्हणून शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती या शासन निर्णयामार्फत आपण प्राप्त करण्यासाठी हा लेख लिहित आहे. हा लेख शासन निर्णयावर आधारित आहे. शुद्धिपत्रक दर्शक शासन निर्णयासाठी संदर्भ दिनांक 07 /02/ 2019 रोजी जो शासन निर्णय निर्गमित झाला आहे. या शासन निर्णयातील असलेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी हा शासन निर्णय पारित करण्यात आला. सुधारित परिशिष्ट या शासन निर्णयात "अ" ते "ड "सोबत समाविष्ट करण्यात आले आहे. संबंधित शुद्धिपत्रक शासन शुद्धिपत्रक दिनांक 25 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयाने खालील प्रकारे आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.


शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता
शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता व आहर्ता निश्चित करणारा शासन निर्णय


शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता(toc)

(१)शुद्धिपत्रक परिशिष्ट "अ" :-

या परिशिष्टामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गासाठी शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षकांची अहर्ता व पात्रता नमूद करण्यात आली आहेत. या वर्गाच्या अध्यापनासाठी निश्चित केलेली अहर्ता. महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त मंडळाची विमान पन्नास टक्के गुण संपादन करून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा .

                         किंवा 

त्यासाठी आवश्यक असणारी समक्ष पात्रता विचारात घेतली जाईल तसेच दोन वर्षाची शिक्षण शास्त्र पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. किंवा मान्यता प्राप्त मंडळाची 50% गुणासह उच्च माध्यमिक किंवा सम कक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची प्राथमिक शिक्षणातील (B.El.ED.) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. किंवा मान्यता प्राप्त मंडळाची किमान 50 टक्के गुणासह उच्च माध्यमिक .

                     किंवा 

समक्ष परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन वर्षांची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदविका परीक्षा (विशेष शिक्षण) राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

                 किंवा

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या नवीन तरतुदीनुसार 2002 प्रमाणे मान्यताप्राप्त मंडळाची किमान 45 टक्के गुणासह उच्च माध्यमिक परीक्षा (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षण शास्त्र दोन वर्षाची पदविका परीक्षा ( D.T.ED.) उत्तीर्ण पाहिजे मग त्यास कोणतेही नाव असो.

          किंवा

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा किमान 50 टक्के गुणासह उत्तीर्ण त्याच बरोबर राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून बी.एड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

             किंवा

TCH (महाराष्ट्र कर्नाटक सीमा वरती भागातील 865 गावातील उमेदवारा संदर्भात कर्नाटक राज्याची टी सी एस परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

                 किंवा

कर्नाटक राज्यातील पीयूसी इन एज्युकेशन भाग एक व भाग दोन इंटरशिप कोर्स हा अभ्यासक्रम टीसीएच अभ्यासक्रमाची सम कक्ष असल्याने या अभ्यासक्रमात (कन्नड माध्यम) राज्यातील डीएड अभ्यासक्रमाची सम कक्ष समजण्यात आले आहे.

टीप:-

जे उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवी वर्गासाठी सर्व विषय शिकवण्यासाठी पात्रता पूर्ण करीत असतील त्यांचा विचार नियुक्ती संदर्भात इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्ग अध्यापनासाठी शिक्षक म्हणून करता येईल.. तथापि, सहा महिन्याचा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेचा प्राथमिक शास्त्रातील अभ्यास क्रम ज्याला आपण ब्रिज कोर्स असे म्हणतो तो पूर्ण केलेला असणे बंधनकारक आहे.

(२) शुद्धिपत्रक परिशिष्ट " ब":-

या परिशिष्टाप्रमाणे इयत्ता सहावी ते आठवी वर्ग अध्यापन करण्यासाठी शिक्षकाची शैक्षणिक व व्यावसायिक आहर्ता. या परिशिष्टामध्ये एकूण एक ते सात विभाग नमूद केले आहेत सर्व विभागाचे सविस्तर माहिती पुढील प्रमाणे स्पष्ट करण्यात येत आहे.

विभाग एक:-हा विभाग भाषा या विषयासाठी स्वतंत्र देण्यात आला आहे. या विभागामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी उर्दू ,कन्नड ,सिंधी ,तेलगू ,गुजराती ,तामिळ, मल्याळम बंगाली, पंजाबी आणि संस्कृत या भाषा समाविष्ट केल्या आहेत. संबंधित भाषा विभागासाठी खालील पात्रता किंवा आहर्ता पुढील प्रमाणे नमूद करण्यात आल्या आहेत.

मान्यता विद्यापीठाची संबंधित भाषा विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात किमान 50 टक्के गुणासह उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची दोन वर्षाची शिक्षण शास्त्र पदविका परीक्षा. (या परीक्षेसाठी कोणतेही नाव असो ) उत्तीर्ण किंवा शिक्षण शास्त्र पदवी बी. एड. किंवा शिक्षण शास्त्र पदवी-बी.एड. (विशेष शिक्षण) राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

                 किंवा

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002 च्या तरतुदीनुसार मान्यता प्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील किमान 45 टक्के गुणासह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतील शिक्षण शास्त्र विषयातील एक वर्षाची (B.Ed.)परीक्षा. ( नाव दिलेले असो ते चालेल).

         किंवा

मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50 टक्के गुणासह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील चार वर्षाची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदवी परीक्षा. (B.El.Ed.) उत्तीर्ण किंवा चार वर्षाची B.A.Ed.(किंवा समकक्ष) परीक्षा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विभाग क्रमांक दोन:-हा विभाग फक्त पर्शियन भाषेसाठी स्वतंत्र घेण्यात आला आहे. या विभागासाठी खालील पात्रता आवश्यक आहे किंवा आहर्ता.

मान्यता प्राप्त विद्यापीठाची पर्शियांना भाषा विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयास किंवा अलिम(Aalim) किमान 50 टक्के गुणासह उत्तीर्ण आणि दोन वर्षाची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदविका (मग त्या पदविकेश कोणतेही नाव असो) उत्तीर्ण किंवा शिक्षण शास्त्र पदवी (बी.एड) किंवा शिक्षण शास्त्र बी. एड. (विशेष शिक्षण) राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

              किंवा

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002 च्या तरतुदीनुसार संबंधित भाषेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान 45% गुणासह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षण शास्त्र या विषयातील एक वर्षाची पदवी (बी .एड.) उत्तीर्ण (त्या परीक्षेत कोणतेही नाव असो)

                 किंवा

मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणासह उच्च माध्यमिक परीक्षा ( किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील चार वर्षाची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदवी परीक्षा (B.El.Ed.) उत्तीर्ण किंवा चार वर्षाची B.A.Ed (किंवा समकक्ष) परीक्षा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

विभाग क्रमांक तीन:- या विभागात अरेबिक भाषा समाविष्ट केली आहे. या भाषेच्या संबंधित शैक्षणिक पात्रता किंवा आहर्ता पुढील प्रमाणे स्पष्ट केली आहेत.

मान्यताप्राप्त विद्यापीठाची अरेबिक भाषा विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किंवा अलिम (Aalim) किमान 50 टक्के गुन्हा सह उत्तीर्ण आणि दोन वर्षांची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदविका परीक्षा (त्या परीक्षेस फळ कोणतेही नाव दिलेले असो) उत्तीर्ण किंवा शिक्षण शास्त्र पदवी ( बी.एड.) किंवा शिक्षण शास्त्र-बी.एड.(विशेष शिक्षण) राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून उत्तीर्ण आवश्यक आहे. किंवा राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या 2002 च्या तरतुदीनुसार मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान 45% गुणासह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षण विषयातील एक वर्षाची पदवी (B.Ed.) उत्तीर्ण (मग त्यास कोणतेही नाव असो) किंवा मान्यता प्राप्त मंडळाची किमान 50% गुणासह उच्च माध्यमिक परीक्षा (किंवा सकमक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील चार वर्षाची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदवी परीक्षा (B.El.Ed.) उत्तीर्ण किंवा चार वर्षाची  B.A.Ed (किंवा सकमक्ष) परीक्षा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण मान्यता प्राप्त संस्थेतून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

(3)शुद्धिपत्रक परिशिष्ट" क"

शासन निर्णयातील या परिशिष्टामध्ये इयत्ता नववी व दहावीच्या वर्गासाठी शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक आहर्ता निश्चित करण्यात आल्या आहे. या परिशिष्टाचे अकरा उपविभाग करण्यात आले आहेत. या अकरा विभागामध्ये खालील प्रमाणे नमूद केलेले विषय व पात्रता दर्शविण्यात आल्या आहेत.

(A)विभाग क्रमांक एक:-

या विभागामध्ये इंग्रजी ,मराठी ,हिंदी उर्दू, कन्नड ,सिंधी ,तेलगू, गुजराती, तामिळ ,मल्याळम, बंगाली ,पंजाबी ,संस्कृत, पाली, अर्धमागधी, जर्मन ,फ्रेंच रशियन आणि जपानी या भाषेचा समावेश केला असून सर्वसामान्यपणे या विभागासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी संबंधित विषयात 50 टक्के गुणासह सह उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील बी.एड. व्यावसायिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. या शासन निर्णयात संपूर्ण माहिती याबाबत निकषासह देण्यात आली आहे. किंवा त्या दृष्टीने समकक्ष पात्रता व आहर्ता आवश्यक असल्यास मान्य करण्यात येईल.

(B)विभाग क्रमांक दोन:-

या विभागामध्ये पर्शियन या विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी 50% गुणासह आणि मान्यता प्राप्त व्यावसायिक पात्रता म्हणून बी.एड .होणे आवश्यक आहे तसेच त्या दृष्टीने समक्ष पात्रता पूर्ण केल्यास ती पात्रता ग्राह्य धरण्यात येईल. शासन निर्णय संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

(C)विभाग क्रमांक तीन:-

या विभागामध्ये अरेबिक भाषा समाविष्ट केली असून या भाषेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पन्नास टक्के गुण उत्तीर्ण आवश्यक आहे . आलिम किंवा फाजील विषयातील किमान गुण 50 टक्के उत्तीर्ण आवश्यक आहे. किंवा सम कक्ष पात्रता असल्यास ग्राह्य धरण्यात येईल याबाबत शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद केले आहे.

(D)विभाग क्रमांक चार:-विभाग क्रमांक 


चार मध्ये गणित विषय हा नमूद करण्यात आला असून मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित किंवा संख्याशास्त्र विषयाची सामान्य पदवी अंतिम वार्षिक वर्षात विषयासह 50 टक्के गुण उत्तीर्ण आणि संबंधित विषयात अध्यापन पद्धती म्हणून गणित व शिक्षण शास्त्रातील गणित  बी.एड.उत्तीर्ण होणे आवश्यक आहे किंवा इतर विद्यापीठाची समकक्ष मान्यताप्राप्त चार वर्षाची पदवी पन्नास टक्के गुन्हा सह ग्राह्य धरण्यात येईल.

(E)विभाग क्रमांक पाच:-

या विभागात विज्ञान विषय समाविष्ट केला असून ज्ञान विषयातील पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पूर्ण करणे आवश्यक असून संबंधित पात्रतेत मान्यता प्राप्त विद्यापीठातील भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र किंवा जीव विज्ञान शास्त्र किंवा पर्यावरण शास्त्र या विषयांचा समावेश असून व्यावसायिक पात्रता म्हणून बीएड ग्राह्य धरण्यात येईल. निर्णयात सविस्तर जाणून घेऊ शकता.

(F)विभाग क्रमांक सहा:-

या विभागामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र विषयातील पदवी व अंतिम वर्षासाठी 50% गुणासह उत्तीर्ण होऊन शिक्षण शास्त्रातील बीएड उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. किंवा त्या दृष्टीने समकक्ष असणारी पात्रता ग्राह्य धरण्यात येईल हेही नमूद केले आहेत.

(G)विभाग क्रमांक सात:-

या विभागामध्ये भूगोल विषयाचा समावेश केला असून मान्यताप्राप्त विद्यापीठातील भूगोल विषयाची पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे व अंतिम वर्षात 50 टक्के गुणासह उत्तीर्ण होणे आवश्यक असून शिक्षण शास्त्र विषयात बीएड धारक पदवीधरांना ग्राह्य धरण्यात येईल किंवा त्याबाबत समकक्ष असणारी पात्रता पूर्ण करणाऱ्या पदवीधारकास ग्राह्य धरण्यात येईल असेही शासन निर्णयात नमूद केले आहे.

(H)भाग क्रमांक आठ:-

या विभागामध्ये गणित व विज्ञान या विषयाचा समावेश केला असून संबंधित विषयातील गणित व विज्ञान तसेच भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र जीव विज्ञान पर्यावरण शास्त्र विषयात पदवी प्राप्त करणारा अंतिम वर्षात 50 टक्के गुण धारण करणारा पदवीधर ग्राह्य धरण्यात येईल किंवा त्याच स्वरूपाची समकक्ष पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक असून मान्यताप्राप्त शिक्षण शास्त्र विषयात बीएड होणे आवश्यक आहे.

(I )विभाग क्रमांक नऊ:-

या विभागामध्ये सामाजिक शास्त्रे म्हणजेच इतिहास ,भूगोल ,समाजशास्त्र ,राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण तसेच या पदी परीक्षेत अंतिम वर्षात 50 टक्के गुण किंवा त्या स्वरूपाची समकक्ष पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शिक्षण शास्त्रातील मान्यता प्राप्त संस्थेतून बीएड होणे आवश्यक आहे.

(J) विभाग क्रमांक दहा:-

या विभागात संरक्षण शास्त्राचा समावेश केला असून मान्यताप्राप्त विद्यापीठातील संबंधित विषयातील सामान्य पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक असून अंतिम वर्षासाठी 50% गुणासह उत्तीर्ण होऊन राष्ट्रीय अध्यापक विद्यालयातील बीएड परीक्षा उत्तीर्ण किंवा त्या स्वरूपाची समकक्ष बीएड पदवी किमान 50 टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.


(K) विभाग क्रमांक 11:-

या विभागात शारीरिक शिक्षण या विषयाचा समावेश केलेला असून संबंधित विषयात शारीरिक शिक्षण याशिवाय ऐच्छिक विषय घेऊन किमान 50 टक्के गुणासह उत्तीर्ण होणे तसेच ऐच्छिक विषय म्हणून शारीरिक शिक्षण या परीक्षेत 45% गुणासह उत्तीर्ण होणे किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा निकस नियम व अटी 2009 नुसार किमान तीन वर्षाचा अनुभव किंवा शारीरिक शिक्षण विषयातील 40% गुणासह उत्तीर्ण किंवा शारीरिक शिक्षण हा वैकल्पिक विषय पदवी परीक्षेत किमान 40% गुणासह उत्तीर्ण किंवा शालेय अंतर महाविद्यालयीन स्तरावर क्रीडा व मैदानी खेळामध्ये सहभागी होऊन उमेदवारास राष्ट्रीय अध्यापक महाविद्यालयातील सर्व निकष व प्रक्रिया नियम क्रमांक सात आधी सूचना दिनांक दहा-बारा दोन नुसार एनसीसी चे सी प्रमाणपत्र प्राप्त होणे आवश्यक आहे तसेच होणे सुद्धा आवश्यक आहे क्रीडा व्यवस्थापन यासारखा एक वर्षाचा ही अभ्यासक्रम किंवा पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून किमान एक वर्ष कालावधीची शारीरिक शिक्षण विषयातील पदवी बी पी एड सम कक्ष उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.


(4)परिशिष्ट ,"ड"

परिशिष्ट ड मध्ये उच्च माध्यमिक वर्गाची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच अहर्ता शासन निर्णयात कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी आवश्यक असणारी बाब नमूद केली आहे. संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन 50% मार्कासह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शिक्षण शास्त्र विषयात बीएड आवश्यक आहे . ज्या शाखेवर त्याची नियुक्ती आवश्यक आहे त्या शाखेतील पोस्ट ग्रॅज्युएशन 50% गुणासह उत्तीर्ण व मान्यताप्राप्त समकक्ष पोस्ट ग्रॅज्युएशन होणे आवश्यक आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आपण संबंधित जीआर मध्ये स्पष्टपणे नमूद केली आहे तो शासन निर्णय आपण या लेखात पीडीएफ स्वरूपात देत आहोत तेथून डाऊनलोड करून घेऊन सर्व विषयाबाबतची माहिती प्राप्त करणे.

सारांश:-

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षक होण्यासाठी आवश्यक पात्रता व व्यावसायिक आहर्ता वर दर्शविल्याप्रमाणे पूर्ण करणारा उमेदवारास संबंधित विभागात ज्या विषयात उत्तीर्ण असेल त्या विषयासाठी अध्यापन करण्यासाठी नियुक्ती या शासन निर्णयाप्रमाणे देता येते परंतु मित्रांनो या विषयासह शासनाची नवीन अट म्हणजे आपणास माहित आहे पोर्टल परीक्षेमार्फत शिक्षक प्रवेश परीक्षा म्हणजे Tait किंवा टी. इ. टी. उत्तीर्ण होण्याची अट बंधनकारक आहे. म्हणून आपण हा शासन निर्णयाचे संपूर्ण स्पष्टीकरण केले आहेत.


संबंधित माहिती प्राप्त करण्यासाठी खालील शासन निर्णयाची पीडीएफ स्वरूपात लिंक डाऊन करू शकता.

       शासन निर्णय शुद्धिपत्रक PDF


FAQ

1) शिक्षकाची शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता निश्चित करणारा शासन निर्णय शुद्धिपत्रक दिनांक सांगा?

दिनांक 25 फेब्रुवारी 2019.


2) परिशिष्ट  "अ "मध्ये कोणत्या वर्गाची शिक्षक पात्रता व अर्थ नमूद केली आहे?

इयत्ता पहिली ते पाचवी.


3) परिशिष्ट "ब "मध्ये कोणत्या वर्गाची शिक्षक पात्रता व अहर्ता नमूद केली आहे?


इयत्ता सहावी ते आठवीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकाची शैक्षणिक पात्रता व अहर्ता नमूद केली आहे.


4) परिशिष्ट क मध्ये कोणत्या वर्गाची शिक्षक पात्रता व अहर्ता नमूद केली आहे?

इयत्ता नववी व दहावी अध्यापन करणाऱ्या शिक्षकाची पात्रता व अहर्ता नमूद केली आहे.

5) परिशिष्ट ड मध्ये कोणत्या वर्गाची पात्रता व अहर्ता नमूद केली आहे.

इयत्ता अकरावी व बारावी उच्च माध्यमिक वर्गाची शैक्षणिक पात्रता व अहर्ता नमूद केली आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील आमचे लेख आवश्यक वाचा.

१) रक्षाबंधन मराठी माहिती.


२) नवीन शैक्षणिक धोरण.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation