Type Here to Get Search Results !

जन्म दाखल्या बाबत सविस्तर मराठी माहिती |Birth certificate about all information in Marathi

 जन्म दाखल्या बाबत सविस्तर मराठी माहिती | Birth certificate about all information in Marathi

प्रस्तावना

मित्रांनो ,भारत सरकारने जन्म दाखल्या बाबत तसेच जन्म मृत्यू नोंद एक महत्त्वाचे विधेयक पारित केले असून त्या विधेयकाला मान्यताही मिळाली आहे दिनांक एक ऑक्टोबर 2023 पासून देश जन्म मृत्यूची नोंदणी सुधारणा कायदा लागू करण्यात येणार आहे. त्या संदर्भाने आपण हा लेख लिहिण्यासाठी हाती घेतला आहे.


 जन्म दाखल्या बाबत माहिती(toc)

संपूर्ण भारतात जन्म मृत्यूची नोंद कायदा 01 ऑक्टोबर 2023 रोजी लागू होणार असल्यामुळे आजच्या लेखक आपण जन्म दाखला कसा काढायचा आणि चुकलेले नाव दुरुस्त कसं करायचं? या संदर्भात संपूर्ण माहिती या लेखातून स्पष्टपणे नमूद करणार आहे. एक ऑक्टोबर 2023 पासून सर्व सरकारी कामकाज करण्यासाठी एकमेव पुरावा लागू करण्यात येणार आहे आणि तो पुरावा म्हणजे जन्म दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र होय. यालाच आपण इंग्रजीमध्ये बर्थ सर्टिफिकेट असे म्हणतो.

जन्म दाखल्याची गरज

मित्रांनो यापुढे आपणास जन्म दाखल्यां ची गरज ही वेगवेगळ्या कामासाठी करावी लागणार आहेत म्हणून आपणास जन्म दाखल्या बाबत संपूर्ण माहिती देण्याच्या उद्देशाने हा लेख लिहीत आहोत.

जन्म दाखल्याची गरज खालील ठिकाणी प्रत्येक नागरिकांना तसेच प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना गरज भासणार आहे.

शिक्षण शिकण्यासाठी शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी जन्म दाखल्याची गरज भासणार आहे.

आपण जर वाहन चालवत असाल तर ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी सुद्धा गरज पडणार आहे.

वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी किंवा मतदान यादी तयार करण्यासाठी जन्म दाखल्याची गरज भासणार आहे. तसेच आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड ला जन्म दाखला म्हणून पुरावा सादर करावा लागणार आहेत. त्याचबरोबर विवाह नोंदणी करण्यासाठी जन्म दाखला हा अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणून किंवा प्रमाणपत्र म्हणून नवयुवक व युवतींना जन्म दाखल्याची गरज पडणार आहेत. जन्म दाखल्या शिवाय विवाह नोंदणी सुद्धा होऊ शकणार नाही. शासन दरबारी किंवा सरकारी किंवा कोणत्याही ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी नियुक्ती देताना जन्म दाखल्याची आवश्यकता असणार आहे. जन्म दाखला हा एक ऑक्टोबर 2023 पासून लागू झाल्यानंतर आपल्याला या जन्म दाखल्याचे महत्व लक्षात येईल. पण हा जन्मदाखला कसा काढायचा आणि यामधील चुका कशा दुरुस्त करायच्या याबाबत आपणास माहिती देण्याच्या उद्देशाने हा लेख आपण लिहीत आहोत.

जन्म दाखल्या तील चुका

आतापर्यंत आपण जन्म दाखल्या कडे दुर्लक्ष करत होतो पण आता दुर्लक्ष करून भागणार नाहीत. जन्म दाखल्या त अनेक प्रकारच्या चुका आढळून येतात. जन्म दाखल्यावर जे नाव दिलेले असते ते बऱ्याच वेळेस चुकीचे सुद्धा असल्याचे समोर येत आहे. जन्म दाखला तयार करताना नावाची स्पेलिंग चुकणे. मराठीत  यामध्ये चुका आढळून येतात. नावाची स्पेलिंग चुकीचे लिहिलेले आढळून येते. दाखल्यावर एक नाव असते आणि प्रत्यक्ष व्यवहारात टोपण नाव वेगळे असते दोन्ही डॉक्युमेंट एकमेकांशी जुळत नाही अशा वेळेस अनेक समस्या समोर येतात. समस्या वेळीच जर आपण सोडवल्या नाही तर भविष्यामध्ये फार मोठे होणारे बदल आणि नुकसान हे सहन करावे लागेल. अशावेळी पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक कामात अडचण निर्माण होऊ नयेत जन्म दाखल्यात कोणतीही चूक होऊ नये. आणि चूक झाली तर ती कशी दुरुस्त करावी याबाबतचे विवेचन करणे आवश्यक असल्यामुळे वेळीच कायदा लागू होण्याच्या अगोदरच पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख लिहिण्याचा मुख्य उद्देश आहे. जन्म दाखल्यात चूक जर झाली तर अनेक अडचणींना सामोरे जाताना जन्म दाखल्या वरील नाव दुरुस्त करणे अपरिहार्य ठरते त्यासाठी जन्मदाखला हा अचूक व मोजक्या शब्दात स्पष्ट माहिती दर्शवणारा असणे आवश्यक आहे. सर्वसामान्यपणे आता शहरी व ग्रामीण भागात बाळंतपणासाठी मुलीला दवाखान्यात ऍडमिट केले जाते व तेथे दवाखान्यात मुलगी बाळा तीन झाल्यानंतर बाळाला जन्म देताना दवाखान्यात जन्म देते म्हणजेच मुलाचा जन्म दवाखान्यात झालेला असतो. दवाखान्यात जन्म झाल्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र जन्म दाखल्याचे मिळते किंवा मिळत असते. ते प्रमाणपत्र दवाखान्यात जन्म झाल्यानंतर दवाखान्या मार्फत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जन्माची नोंद दवाखान्यामध्ये मार्फत होते व त्यानंतर पालकाला आपल्या पाल्याचा जन्म दाखला मिळवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत अर्ज सादर करून जन्म दाखला प्राप्त होत असतो. पालकांनी यापुढे मुलाचा जन्म झाल्यानंतर लवकरात लवकर जन्म दाखला प्राप्त करणे गरजेचे आहेत. याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नका. परंतु असे लक्षात येते की पालक मुलाचा जन्म दाखला वेळेवर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्राप्त करत नाही . आपल्या मुलाचा जन्म दाखला घेण्यास उशीर करतात. त्यावेळी त्या दाखल्यावर काही चुका असल्याचे निदर्शनास येते. दवाखान्यात वेगळीच नाव दिलेली असते व व्यवहारात वेगळीच नाव असते. दोन्ही नावाचा कुठेही एकमेकांशी संबंध जुळत नाही. जन्म दाखल्या वर स्पेलिंग आणि नावात होणाऱ्या असंख्य चुका झालेल्या आढळून येतात. पुढे आणि कामासाठी ह्या गोष्टी त्रासदायक कोण बसतात. त्यासाठी वेळीच जन्म झाल्याबरोबर सात ते पंधरा दिवसाच्या आत पालकाने आपल्या मुलाचा दाखला संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्राप्त केला पाहिजे. दवाखान्यात जन्माची नोंद झालेली असते पण नावाची नोंद झालेली नसते. दवाखान्या नी स्थानिक स्वराज्य संस्थेची नोंद केलेली असते ती जन्माची नोंद केलेली असते नावाची नोंद झालेली नसते. कारण बाळाला काय नाव देणार हा प्रश्न पालकाचा असतो. पालकाने स्थानिक स्वराज्य संस्थेत जाऊन आपल्या पाल्याला काय नाव ठेवले आहेत ते नाव स्थानिक स्वराज्य संस्थेत नोंदवणे व त्या नावाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून दाखला घेणे आवश्यक आहे. कारण भविष्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये हा या पाठीमागचा उद्देश असतो. म्हणूनच मित्रांनो आज आपण आपल्या लेखाच्या माध्यमातून जन्म दाखल्यावर नाव कसं समाविष्ट करायचे तसेच दाखल्या तील नावाच्या दुरुस्ती कशा करायच्या याबद्दल विशेष माहिती जाणून घेणे आवश्यक आहे म्हणून याबाबत आपण सविस्तर माहिती पुढील प्रमाणे या लेखात नमूद करत आहे.

जन्म दाखल्या त नाव कसे समाविष्ट करावे?

केवळ जन्माची नोंद झालेले नागरिक नावाशिवाय जन्म दाखल्या त त्याच्या पाल्याचे नाव समाविष्ट करू शकतात किंवा करता येते.

काही नागरिक किंवा काही पालक आपल्या पाल्याची नावाशिवाय जन्म नोंद झालेली आहेत हे माहीतच नसते. या गोष्टीला पंधरा ते वीस वर्षे उलटून गेलेले असतात आणि मग अशा नागरिकांना जन्म दाखल्याची गरज भासते. पंधरा वर्षे चा कालावधी उलटून गेला आहे, त्याच्या जन्म दाखल्यावर नवीन नियमाप्रमाणे आपले नांव समाविष्ट करू शकतात. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फक्त जन्माची नोंद असते नावाची नोंद नसते त्यामुळे आपल्याला योग्य ते नांव सांगून स्थानिक स्वराज्य संस्थेकडून पंधरा वर्षाचा कालखंड ओलांडला तरी सुद्धा जन्म दाखला तयार करून घेता येईल.

मित्रांनो,  नागरिकांना नाव नोंदणी करण्यासाठी व दुरुस्ती करण्यासाठी 1969 पूर्वीच्या जन्म नोंदीच्या नावाचा उल्लेख नसलेले नागरिक आता अर्ज करू शकतात. जन्म दाखल्यात नोंद करण्याची मुदत शासनामार्फत 27 एप्रिल 2036 नावाची नोंदणी करता येणार आहे. परंतु येते स्पष्ट असा उल्लेख केला आहे की, बाळाच्या नावाची नोंदणी त्यानंतर जन्म दाखल्यात करता येणार नाहीत असे स्पष्टपणे शासनाकडून नमूद करण्यात आले आहेत. या प्रकारची माहिती आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेली आहेत.

नाव नोंदणी करण्यासाठी कोठे जाणे आवश्यक आहे?

नागरिकांनी जन्माची नोंद जर केलेली असेल तर त्या नागरिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची नाव नोंदणी करण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधने अत्यंत महत्त्वाचे आहे. उपरोक्त वाक्याचा अर्थ असा होतो की, ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवक यांच्याकडे जन्माची नोंद करणे. शहरी भागामध्ये नागरिकांनी संबंधित नगरपरिषद किंवा महानगरपालिका यांच्याशी नाव नोंदणी करण्याबाबत संपर्क साधने आवश्यक आहे. तिथे जाऊन संपर्क करणे व जन्माची नोंदणी करणे हे आवश्यक आहे.

अर्जदाराला म्हणजेच नागरिकाला किंवा नागरिकांच्या पाल्याला आपल्या जन्म दाखल्यात नांव समाविष्ट करावयाचे असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा नगरपालिका तसेच महानगरपालिका येथे जाऊन जन्म दाखल्यात नाव नोंदवता येईल. हे नाव नोंदण्या साठी अर्जदार जवळ आपल्या नावाचा उल्लेख असलेल्या शाळा सोडण्याचा दाखला म्हणजेच( TC) शाळा सोडल्याचे त्याचबरोबर इयत्ता दहावी आणि बारावी यांचे प्रमाण पत्र जे प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ यांच्याकडून प्राप्त झालेले असते किंवा इतर राज्यातील संबंधित बोर्डाकडून प्राप्त झालेले आपले नांव दर्शक प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका किंवा आधार कार्ड हे पुरावे सोबत जोडावे लागणार आहे. आपले नांव दर्शक प्रमाणपत्र सादर करून जन्म दाखला संबंधित कार्यालयातून प्राप्त करता येईल. म्हणजे नागरिकाला जन्म दाखला प्राप्त करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याकडे जाऊन जन्म दाखला प्राप्त करता येईल.

जन्म दाखल्या दुरुस्ती करण्याची पद्धत

नावात बदल किंवा दुरुस्ती करण्यासाठीनागरिकाला जन्म दाखल्यात झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी प्रथम शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तयार करून ते प्रतिज्ञापत्र तहसील कार्यालयातून प्रामाणिक करून घेऊन जो आपणास बदल करणे आवश्यक आहे त्या बदलाच्या संदर्भात कोणत्या स्वरूपाची दुरुस्ती आहे ते स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र यालाच आपण शपथपत्र असेही सुद्धा म्हणतो ते शपथ पत्र सादर करणे आवश्यक आहे. शपथ पत्र तयार करताना अर्जदारांनी आपली संपूर्ण माहिती या शपथपत्रात नमूद करणे आवश्यक आहे. जुने चुकलेले नांव काय आहेत हे शपथ पत्रात नमूद केल्यानंतर नवीन नाव जन्म दाखल्यात कोणते नमूद करायचे आहेत त्याची स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे. शपथपत्रांत  असे स्पष्टपणे लिहिणे की नजर चुकीने माझे नांव उदाहरणार्थ रामप्रसाद आहे. पण हे नाव चुकलेले आहेत. हे नाव बदलून या नांव ऐवजी माझ्या जन्म दाखल्यात रामदास असे नांव टाकण्यात यावे. नजरचुकीने झालेली ही आता दुरुस्त करावी करीत आहे शपथ पत्र सादर करत आहेत. अशा प्रकारचे शपथ पत्र हे अर्जदाराला सेतू कार्यालय मधून किंवा शासनमान्य अधिकृत रजिस्टर प्राप्त नोटरी वकिल कडून तयार करून घेऊन घेणे. अर्जदाराला या शपथपत्र बरोबर पालकाचे आधार कार्ड तसेच ज्या बाळांचे नांव बदलायचे आहेत. त्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. अर्जदाराने पालकाचे व बाळाचे आधार कार्ड चे झेरॉक्स प्रत योग्य दुरुस्तीसाठी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराने अर्ज केल्यापासून असे अपेक्षित आहे की आठ ते दहा दिवसात जन्म दाखला योग्य दुरुस्ती सह प्राप्त करून देण्यात येईल. असे शासनातर्फे नमूद केले आहेत ‌.

जन्माची नोंद घेण्याची योग्य पद्धत

बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या जन्माची नोंद योग्य ठिकाणी 21 दिवसाच्या आत करणे आवश्यक आहे. हा नवीन नियम शासनाने लागू केला आहे. बाळाचा जन्म जर खेड्यामध्ये किंवा ग्रामीण भागात झाला असेल तर ग्रामपंचायत मध्ये 21 दिवसाच्या आत जन्माची नोंद करणे अत्यंत गरजेचे आहेत. जर बाळाचा जन्म नगरपालिका किंवा महानगरपालिका म्हणजेच शहरी क्षेत्रात झाला असल्यास त्या बाळांच्या जन्माची नोंद ज्या कार्यक्षेत्रात झाली असेल त्या कार्यक्षेत्र च्या नगरपालिके मध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये जन्म नोंद करणे नागरिकांना आवश्यक आहे. बाळाची जन्माची नोंद जन्म झाल्याबरोबर  त्यासंबंधी माहिती जर 21 दिवसाच्या आत किंवा वेळेवर देणे बंधनकारक आहेत. शासकीय नियमात ही अट नमूद केली आहे. जर बाळ जन्माची नोंद 21 दिवसात केली आणि 21 दिवसाच्या आत जन्माचा दाखला मागितल्यास संबंधित नागरिकास तो मोफत देण्याची व्यवस्था शासनामार्फत करण्यात येणार आहे. याचा अर्थ असा होतो की ही प्रक्रिया 21 दिवसात पूर्ण करणे अपेक्षित आहे जन्म दाखला  प्राप्त करणे आवश्यक आहे. जर बाळाच्या जन्माची नोंद 21 दिवसाच्या आत केली नसल्यास विलंब झाल्यास संबंधित नागरिकाला विलंब शुल्क आकारले जातील असे स्पष्टपणे नमूद केले आहे. आई-वडिलांना आपल्या मुलाचा जन्म दाखला प्राप्त करण्यासाठी आई-वडिलांचे आधार कार्ड व बाळाचे आधार कार्ड काढले असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेकडे अर्जासोबत जमा करणे आवश्यक आहे. जर बाळाचा जन्म दवाखान्यात झाला असेल तर दवाखान्यातून मिळालेले जन्म प्रमाणपत्र या कागदाच्या आधारे जन्म दाखला देण्यात येत असतो. म्हणून आई-वडिलांनी आपल्या बाळांच्या जन्मांची नोंद योग्य पद्धतीने करून योग्य कार्यवाही करून लेखात नमूद केलेल्या कागदपत्रा सह पुरावे सादर करून जन्म दाखला प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे. आताही काळाची गरज आहे. यापुढे अनेक सरकारी कामासाठी हाच जन्म दाखला हा एकमेव पुरावा म्हणून सरकार ग्राह्य धरणार आहे याची आई वडिलांनी किंवा नागरिकांनी नोंद घ्यावी.

सारांश

संबंधित लेखांमध्ये जन्म दाखल्याची गरज व आवश्यकता प्रतिपादन करून जन्म दाखला कसा काढायचा आहे? काढण्याची पद्धत कशी आहे? आणि जन्म दाखला कुठून काढणे. संदर्भामध्ये सविस्तर माहिती प्रतिपादन केली आहे. कारण आता सर्व ठिकाणी सरकारी कामकाज करताना जन्म दाखला हा एकमेव पुरावा ग्राह्य धरणार असल्याचा कायदा भारत सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर केला असून हा कायदा आज लेख लिहीत आहे तो दिवस म्हणजे एक ऑक्टोबर 2023 हा होय. 01 ऑक्टोबर 2023 पासून जन्म मृत्यू नोंद सुधारणा कायदा भारत सरकारने लागू केला आहेत. त्यामुळे जन्म मृत्यूच्या नोंद बाबत नागरिकांना किंवा आई-वडिलांना माहिती देणे आवश्यक असल्यामुळे हा लेख लिहिण्याचे प्रयोजन करून लेखांमध्ये सर्व गोष्टी नाव नमूद कसे करावे कोठे? करावे दुरुस्ती व कशी करावी? शपथ पत्र कसे लिहावे? व जन्म दाखल्यां ची गरज व आवश्यकता प्रतिपादन करण्यात आली आहे.

FAQ

1) देशभरात जन्म मृत्यू सुधारणा कायदा केव्हापासून लागू होणार आहे?

एक ऑक्टोबर 2023

2) सरकारी कामकाजात एकमेव पुरावा कोणता धरण्यात येणार आहे?

जन्म दाखला.

3) जन्म दाखल्याची नोंद कुठे केलेली असते?

स्थानिक स्वराज्य संस्था .

4) जन्माची नोंद किती दिवसाच्या आत करावी लागते?

21 दिवसाच्या आत.

5) 21 दिवसाच्या आत जन्माची नोंद न केल्यास त्याचा परिणाम काय होईल?

जन्म दाखला काढण्यासाठी विलंब शुल्क आकारण्यात येईल.

आमचे इतर लेख आवश्यक वाचा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation